BENAULIM  Dainik Gomantak
गोवा

Benaulim News : अखेर ‘त्या’ फादरने दिला राजीनामा; लोकांमध्ये संताप

शिष्‍टमंडळ न आल्याने तणाव

दैनिक गोमन्तक डिजिटल

होली ट्रिनिटी चर्चचे फा. अँथनी रॉड्रिग्स यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करून चर्चवर चाल करून आलेल्या स्थानिकांच्या मोर्चामुळे दबावाखाली आलेल्या फादरनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सोमवारी (ता.29) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला तणाव सायंकाळी ७ वाजता संपुष्टात आला.

दरम्यान, फा. रॉड्रिग्स आणि स्‍थानिक यांच्‍यात मागच्‍या दोन महिन्‍यांपासून तणावपूर्ण वातावरण असून मधल्‍या काळात या चर्चमधील एका कनिष्‍ठ पाद्रीची बदली केल्‍याने स्‍थानिकांचे मत फा. रॉड्रिग्स यांच्‍याबद्दल अधिकच प्रक्षुब्‍ध झाले होते.

फा. रॉड्रिग्स यांच्‍या विरोधात स्‍थानिकांनी आर्च बिशप कार्यालयात तक्रार केली होती. सोमवारी या कार्यालयाचे एक शिष्‍टमंडळ चौकशीसाठी चर्चमध्‍ये येणार होते. मात्र, हे शिष्‍टमंडळ आलेच नाही. त्‍यामुळे भडकलेल्‍या स्‍थानिकांनी चर्चवर मोर्चा आणणे पसंत केले.

मोठ्या प्रमाणावर जमाव चाल करून आल्‍याने फा. रॉड्रिग्स यांनी स्‍वत:ला एका खोलीत बंदिस्‍त करून घेतले. त्‍यानंतर पोलिसांना पाचारण करण्‍यात आले. कोलवा, मायणा-कुडतरी, वेर्णा आणि फातोर्डा येथील पोलिस या ठिकाणी तैनात करण्‍यात आले होते. परिस्‍थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सासष्‍टीचे मामलेदार लक्ष्‍मीकांत देसाई हेही घटनास्‍थळी हजर झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT