Goa University: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल रद्द करण्याच्या विद्यापीठाच्या मागणीवर सरकारचा मोठा निर्णय

सर्व मुख्याध्यापकांनी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रॅक्टिकल सुरू ठेवावे असे सांगितले.
Goa University demand to cancel practicals for FY science students government denies GU's demand
Goa University demand to cancel practicals for FY science students government denies GU's demandDainik Gomantak
Published on
Updated on

Goa University: प्रथम वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल बंद करण्याचा वादग्रस्त निर्णय गोवा विद्यापीठाने सादर केला होता. मात्र हा निर्णय राज्य सरकारने फेटाळून लावला आहे.

विद्यापीठाच्या या निर्णयानंतर राज्य सरकारने महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. सर्व मुख्याध्यापकांनी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रॅक्टिकल सुरू ठेवावे असे सांगितले.

Goa University demand to cancel practicals for FY science students government denies GU's demand
Bank Fraud Case: बँक व्यवहारातून ज्‍येष्‍ठ नागरिकाची तब्‍बल 4.5 लाखांची फसवणूक

याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गोवा विद्यापिठाच्या या निर्णयावर सरकारने विचार केला आणि विद्यापीठाला प्रॅक्टिकल सुरू ठेवण्यास सांगितले आहे.

हा मुद्दा महत्वाचा होता, त्यामुळे संबंधितांशी आणि विद्यापीठाशी चर्चा करूनच हा प्रश्न सोडवण्यात आला.

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने प्रथम वर्षाच्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी थिअरी लेक्चर्स व्यतिरिक्त प्रात्यक्षिक घटकांचा समावेश करून अभ्यासक्रम प्रस्तावित केला असला तरी, विद्यापीठाने अभ्यासक्रमातून प्रात्यक्षिक घटक वगळण्याचा आग्रह धरला होता.

गोवा विद्यापीठाच्या या निर्णयामुळे शिक्षक समुदायामध्ये रोष निर्माण झाला होता; कारण NEP व्यावहारिक प्रशिक्षणावर भर देते.

गोवा विद्यापीठ 6 मे ला झालेल्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत प्रथम वर्षाच्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकांचा समावेश न करण्याच्या भूमिकेवर ठाम होते. यानंतर शिक्षक आणि गोवा विद्यापीठ यांच्यातील वाद लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला.

तिसवाडी येथील एका नामांकित महाविद्यालयातील प्राचार्याने (नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगितले की, प्रथम वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल असावे.

कारण जेव्हा आपण कौशल्य विकासाबद्दल बोलतो तेव्हा आपण सरावाशिवाय कौशल्याचा विचार करू शकत नाही.

विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त थिअरीचे ज्ञान पुरेसे नसून त्या थिअरीचे प्रात्यक्षिक ज्ञान जाणून घेणे आणि सराव करणेही महत्वाचे आहे; कारण विज्ञान हे थिअरीपेक्षा प्रात्यक्षिक गोष्टींवर अवलंबून आहे, असे मत राज्यातील अनेक शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com