house catches fire in Benaulim Dainik Gomantak
गोवा

Benaulim: बाणावलीत घराला आग; साडेतीन लाखांचे नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय

Benaulim House Fire: वासवाडो बाणावली येथे एका घराला रविवारी सकाळी आग लागून, साडेतीन लाखांचे नुकसान झाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: वासवाडो बाणावली येथे एका घराला रविवारी सकाळी आग लागून, साडेतीन लाखांचे नुकसान झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग विझवताना आठ लाखांची मालमत्ता वाचविली.

सकाळी सातच्या दरम्यान आगीची ही घटना घडली. फिलिम्पो रॉड्रिग्स यांच्या मालकीचे हे घर आहे. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की घरातील दोन बेडरूम्स पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यामध्ये कपाट आणि छताचे वासे, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, सोफा सेट आणि बेड अशा वस्तूंचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.

मोठे नुकसान टळले

अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर सकाळी ९ वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. जवानांच्या या कामगिरीमुळे घराचा उर्वरित भाग वाचवण्यात यश आले, ज्यामुळे मोठे नुकसान टळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT