कौलोत्सव Dainik Gomantak
गोवा

पिसुर्लेत कौलोत्सवास प्रारंभ

घरोघरी कळस फिरवून दर्शन: महाजन मंडळीत दोन गट

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पिसुर्ले येथील शिमगोत्सवाची सांगता धुळवडीच्या गुलालाने करून 23 मार्चपासून नवदुर्गा मंदिरातील कळस बाहेर काढून कौलोत्सवाला सुरवात झाली. परंतु गावातील महाजन मंडळींमध्ये दोन गट पडले असल्याने एकच गट या उत्सवात सहभागी झाला.या गावातील शिमगोत्सवाला मोठी परंपरा असून पाच दिवस शिमगोत्सव साजरा करून सहाव्या दिवशी नाटक सादर केले जाते. सातव्या दिवशी देवाला गुलाल चढवून धुळवड साजरी केली जाते.

त्यानंतर दुपारी नवदुर्गा मंदिरातील कळस वाजत-गाजत बाहेर काढून काही प्रमुख महाजनांद्वारे तो कळस काही वाड्यांवरील घरांमध्ये फिरवला जातो. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असून यामध्ये धाटवाडा, धोणकलवाडा, बानवाडा, शांतीनगर, पिसुर्ले देऊळवाडा व गावकरवाडा यांचा समावेश आहे.

हा कळस बाहेर काढताना येथील महादेव मंदिरात त्याची पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर ढोल- ताशांच्या गजरात कळस घरोघरी नेऊन तेथे खणानारळाने ओटी भरली जाते. त्याचप्रमाणे पूजाही केली जाते. यावेळी ग्रामस्थांकडून नवस बोलले जातात आणि पूर्णही केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT