Goa Health camp
Goa Health campDainik Gomantak

Goa Health camp: 'धकाधकीच्या जीवनात स्वत:चे आरोग्य जपा'

नूतन बिचोलकर: शिवोलीत स्वामी समर्थ मठात आरोग्य शिबिर
Published on

शिवोली: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पैसा कमावण्याच्या नादात अनेकांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते; परंतु हीच गोष्ट पुढे धोकादायक बनून सर्वांनाच झळ पोहोचवू शकते. म्हणून ‘आरोग्यम धनसंपदा’ या म्हणीची दखल घेत स्वत:बरोबरच इतरांच्याही आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन म्हापसा येथील नगरसेविका तसेच सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य डॉ. नूतन बिचोलकर यांनी केले.

Goa Health camp
Goa Shipyard Recruitment 2022: गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 264 पदांची भरती

शिवोलीतील स्वामी समर्थ मठ तसेच स्थानिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी मठाच्या प्रांगणात आयोजित विशेष आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुण्या या नात्याने डॉ. बिचोलकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर, डॉ. उमाली रोहिदास, डॉ. श्रुती शेट नार्वेकर, अजीत च्यारी, दत्ताराम बिचोलकर तसेच समर्थन संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर, यदुवीर सीमेपुरुषकर, हृतिक आगरवाडेकर, अमीत मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर म्हणाले, शिवोलीतील स्वामींचा मठ हा धार्मिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक उपक्रमांचा संगम असलेले बहुजनांच्या हिताचे संस्कारी केंद्र आहे. येथील उपक्रमांचा शिवोलीबरोबरच उत्तर गोव्यातील जनता घेत आहे. यावेळी, डॉ. उमाली रोहिदास, डॉ. श्रुती शेट नार्वेकर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.

Goa Health camp
मडगाव पालिकेतील मान्सूनपूर्व कामांची प्रक्रिया थंडावली

80 रुग्णांना शिबिराचा लाभ

रुग्णांच्या शारीरिक चिकित्सेपासून दंतचिकित्सा आणि आयुर्वेदापासून नेत्रचिकित्सेपर्यंत विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. गुरुवारी सुमारे 80 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिवोली आरोग्य केंद्राच्या डॉ. उमाली रोहिदास, डॉ. अमीना पत्रे, (आयुर्वेद) डॉ. रेश्मा लोटलीकर (दंत चिकित्सक ) डॉ. श्रुती शेट नार्वेकर, नूतन पाळणी, अजीत च्यारी आदींनी भाग घेतला. सूत्रसंचालन पत्रकार संतोष गोवेकर यांनी केले, तर यदुवीर सीमेपुरुषकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com