Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: ‘वकील’ बनून आला, अन्‌ चोरी करून गेला!

न्यायालयाच्या मुद्देमाल कक्षात वकिलाच्या वेशात आलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षक असूनही आल्तिनो-पणजी येथील प्रथमश्रेणी न्यायालयाच्या मुद्देमाल कक्षात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. वकिलाच्या वेशात आलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे उघड झाले आहे.

मात्र किती दागिने व रक्कम चोरीला गेली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. सुरक्षारक्षकांच्‍या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. चोरट्याने ही चोरी दागिने व पैशांच्या हव्‍यासापोटी केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

या न्यायालयाचे कर्मचारी आज बुधवारी सकाळी ड्युटीवर आले असता तळमजल्यावर असलेल्या प्रथमश्रेणी न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील मुद्देमाल कक्षाचा दरवाचा व त्याच्या मागील बाजूस असलेले दार खुले असल्याचे आढळून आले. कपाटेही खुली असलेली व मुद्देमाल अस्तावस्त पडलेला दिसला.

त्यामुळे चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आल्यावर त्याची माहिती मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी पणजी पोलिसांना कल्‍पना दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोणता मुद्देमाल चोरीला गेला आहे याची तपासणी न्यायालयाकडे असलेल्या यादीनुसार करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्याने चोरी करण्यापूर्वी या न्यायालय इमारतीची संपूर्णपणे टेहळणी केली असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाची ही एकमेव इमारत तेथील न्यायालयाच्या संकुलाबाहेर आहे तसेच या ठिकाणी मुद्देमाल कक्ष असल्याचे चोरट्यानी माहिती मिळवली असावी.

या ठिकाणी गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षक प्रत्येक इमाततीसाठी तैनात केलेले आहेत. मात्र ज्या इमारतीत ही चोरी झाली तेथे असलेला सुरक्षारक्षक रात्रीच्यावेळी तेथे नसल्याने ही चोरी झाली असण्याची शक्यता आहे. या सुरक्षारक्षकाची चौकशी केली असता त्याचा निष्काळजीपणा समोर आला.

चोरट्याने चोरी करण्यासाठी बॅगेमधून काही अवजारे आणली असण्याची शक्यता आहे. त्याने मुद्देमाल कक्षात असलेले सीलबंद मुद्देमालाचे गठ्ठे बॅटरीच्या प्रकाशात सोडविण्यास सुरुवात केली. अनेक मुद्देमालाचे गठ्ठे विस्कटलेले होते.

ज्यामध्ये रोख रक्कम व दागिने सापडले, ते त्याने लंपास केले. या कक्षात नोटाबंदी झालेले पाचशे व एक हजार रुपयांच्‍या लाखो नोटा होत्या. मात्र चोरट्याने त्या तेथेच टाकून दिल्या. या चोरट्याने इमारतीत असलेल्या मुद्देमालाबाबत पूर्ण माहिती मिळवून चोरी केली असण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT