Bastora Accident Dainik Gomantak
गोवा

Bastora Accident: भरधाव वेगात गाडी चालवणं अन् स्टंटबाजी करणं जीवावर बेतलं; 21 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी अंत

Goa Accident: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून रविवारी (१९ मे) एक दुर्दैवी घटना घडली. करासवाडा-म्हापसा येथील २१ वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला.

Sameer Amunekar

म्हापसा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून रविवारी (१९ मे) एक दुर्दैवी घटना घडली. करासवाडा येथील २१ वर्षीय युवक साईराज मोरजकर याचा बस्तोडा परिसरात दुचाकी अपघातात मृत्यू झाला. अतिवेगात वाहन चालवणे आणि स्टंटबाजी यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, साईराज मोरजकर रविवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून बस्तोरा मार्गावरून जात असताना स्टंट करत गाडी चालवत होता. या दरम्यान त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला.

अपघात एवढा भीषण होता की त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. विशेष म्हणजे, त्याच्या दुचाकीला मागील व पुढील बाजूस नंबर प्लेट नसल्याचंही समोर आलं आहे.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करून घटनास्थळी बोलावलं. साईराजला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करताना त्याला मृत घोषित केलं.

या अपघातामुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून तरुणाईत वाढत चाललेली स्टंटबाजी आणि वाहन चालवण्यातील बेपर्वाईबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT