Pernem News Dainik Gomantak
गोवा

Pernem News: गोव्यातील 'या' गावात आता बारवर बंदी; यापुढे बारला परवानाही देणार नाही!

ग्रामसभेतील निर्णयाची पत्रकार परिषदेत दिली माहिती

गोमंतक ऑनलाईन टीम

Pernem News: देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याचे मद्यविषयक धोरण वेगळे आहे. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात मद्याचे दर स्वस्त असतात. त्याचा लाभ येथे येणारे पर्यटक घेत असतात आणि त्यातून गोवा सरकारलाही मोठे उत्पन्न मिळत असते. पण आता गोव्यातील एका गावाने गावातील बारवर चक्क बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील वारखंड या गावाने हा निर्णय घेतला आहे. वारखंडच्या सरपंच गौरी जोसालकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ग्रामसभेत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. वारखंड गावची अस्मिता राखण्यासाठी तसेच हे गाव आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वारखंड पंचायत क्षेत्रात जीएमआरतर्फे जे बांधकाम सुरू आहे, त्यावरही आक्षेप घेऊन संबंधितांना निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतीच्या महसुलाबाबतही आमदारांना निवेदन दिले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार याबाबतचा ठराव करण्यात आला.

दरम्यान, पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्याबाबत पाठपुरावा केला जात आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडणेतील टॅक्सीचालकांना स्वतंत्र काऊंटर द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

तसेच जीएमआरच्या प्रोजेक्टसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळेल असे सरकारने सांगितले होते. पण अद्याप त्याची पुर्तता झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT