Goa Fraud case: ब्रिटनमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने गोव्यातील युवतीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोव्यातील युवकाची सुमारे 1 लाख 75 हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
म्युरिएल वाझ असे फसवणूक झालेल्या तरूणीचे नाव आहे. ती रातवाडो, नावेली येथील रहिवासी आहे. तर विल्यम जॅक्सन असे संशयिताचे नाव असून तो मूळचा ब्रिटिश नागरिक आहे.
विल्यम जॅक्सन याने म्युरिएलशी सोशल मीडियावरून माहितीची देवाणघेवाण केली होती. ब्रिटनमध्ये क्लार्कची नोकरी देण्याचे आमिष त्याने दाखवले होते.
त्यासाठी विविध बँकांमध्ये डिपॉझिट भरून घेतले. म्युरिएलनेही जॅक्सनच्या भुलथापांना बळी पडत डिपॉझिटची रक्कम जॅक्सनने सांगितलेल्या बँकांमध्ये वेळोवेळी भरली. पण तिच्या नोकरीबाबत काहीही हालचाल किंवा चर्चा झाली नाही.
तिने वारंवार जॅक्सनला नोकरीबाबत विचारणा केली मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जॅक्सन म्युरिएल हिला नोकरी तर देऊ शकलाच नाही, पण म्युरिएलने दिलेले पैसेही जॅक्सन परत करू शकला नाही. त्यामुळे म्युरिएलने जॅक्सनविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.