Sexual Assault Case Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: महिलेचा अनन्वित लैंगिक छळ प्रकरणी न्यायालयाचा दणका; मुलाला 11 वर्षे, आईसह पत्नीला एक वर्षाचा कारावास

Bardez Sexual Assault Case: मुख्य आरोपी असलेल्या मुलाला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत ११ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बार्देश तालुक्यात जून २०१४ मध्ये एका महिलेवर झालेल्या गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोक्सो न्यायालयाने एकाच कुटुंबातील तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मुख्य आरोपी असलेल्या मुलाला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत ११ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर आई आणि बायकोला एक वर्षाचा कारावास आणि दंडाची शिक्षा केली आहे.

न्या. डॉ. पूजा कवळेकर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने स्पष्ट केले की, पीडितेच्या गुप्तांगात मिरचीची पूड भरणे, ही कृती भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ मधील सुधारित व्याख्येनुसार थेट ‘बलात्कार’ ठरते.

प्रकरणातील माहितीनुसार, ही घटना २३ जून २०१४ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. आरोपींनी पीडित महिलेला ओढत आपल्या घरात नेले आणि तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार केले.

अत्याचाराची परिसीमा

पीडित महिलेला जबरदस्तीने जमिनीवर जखडून ठेवले आणि सिमेंटचा दगड, लाकडी दांडा आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. पीडितेच्या संपूर्ण शरीरावर मिरची आणि हळदीची पूड टाकण्यात आली. कपडे फाडून तिला विवस्त्र केले. मुख्य आरोपीने पीडितेच्या गुप्तांगात अत्यंत क्रूरपणे तिखट व हळदीची पूड कोंबली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

पीडितेच्या मुलीने दाखविले धारिष्ट्य

सरकारी पक्षाने या खटल्यात तब्बल १३ साक्षीदारांची तपासणी केली. यात पीडित महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीची साक्ष आणि शेजाऱ्यांचे जबाब महत्त्वाचे ठरले. या घटनेच्या वेळी शाळेत शिक्षण घेत असलेल्या पीडितेच्या मुलीने आरोपींचा क्रूरपणा पाहिला होता. या घटनेवेळी तिने शेजाऱ्यांना बोलावून आणि ‘चाईल्ड हेल्पलाईन’सह पोलिसांना फोन करून मदत मागितली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT