Ganesh Chaturthi in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi: गोव्यात बाप्पांचे जल्लोषात स्वागत!

कुटुंबांच्या परंपरेनुसार दीड दिवस, तीन दिवस किंवा पाच दिवस मूर्तींची पूजा केली जाईल

दैनिक गोमन्तक

पणजी: बुधवारी गणेश चतुर्थीला भक्तांनी घरोघरी गणपतीचे स्वागत केले. भाविकांनी आपल्या घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना, धार्मिक उत्साहात आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात केली. कुटुंबांच्या परंपरेनुसार दीड दिवस, तीन दिवस किंवा पाच दिवस मूर्तींची पूजा केली जाईल, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आयोजित केलेला उत्सव 11 दिवस सुरू राहणार आहे.

(Bappa was welcomed in Goa with ecstasy)

मंगळवारी सायंकाळी काही भाविकांनी पारंपरिक मातीच्या मूर्तींची खरेदी केली होती. माटोळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची राज्यभरातील फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोक जोरदार खरेदी करताना दिसले. मिठाईच्या वाढत्या किमतींमुळेही लोक त्या खरेदी करण्यापासून परावृत्त झाले नाहीत.

कोविड-19 साथीच्या आजारामुळे दोन वर्षांच्या मंद उत्सवानंतर, या वर्षी मोठ्या संख्येने लोकांनी त्यांच्या मूळ ठिकाणी प्रवास केला, कारण रेल्वेने जादा गाड्या चालवल्या आणि सरकारी मालकीच्या केटीसीनेही प्रचंड गर्दी आटोक्यात अणण्यासाठी जादा बसेस चालवल्या. गोवा पोलिसांनी लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे, तसेच सतर्क राहत जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावे आणि त्यांचे मौल्यवान सामान त्यांच्या बंद घरात सोडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्यांनी भाविकांना दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT