MLA Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023: बाप्‍पा, मोदीच पंतप्रधान होऊ देत, आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे

Ganesh Chaturthi 2023: श्री गणरायाच्या आशीर्वादाने राज्‍याचा चांगला विकास होवो. तसेच पुन्‍हा एकदा नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत.

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi 2023: श्री गणरायाच्या आशीर्वादाने राज्‍याचा चांगला विकास होवो. तसेच पुन्‍हा एकदा नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत. त्‍यासाठी त्यांना चांगले आरोग्य लाभो, असे साकडे आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आपल्‍या विठ्ठलापूर-साखळी येथील निवासस्‍थानी श्री गणरायाला घातले. वडील माजी मुख्‍यमंत्री प्रतापसिंह राणे, आई विजयादेवी राणे, पत्नी आमदार डॉ. दिव्‍या राणे, बहीण विश्‍‍वधारा व अन्‍य कुटुंबीयांसमवेत त्‍यांनी हा सण साजरा केला.

गणेश चतुर्थी हा आनंदाचा व उत्साहाचा सण. दरवर्षी आम्ही गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो. या आनंदाच्या उत्‍सवात संपूर्ण कुटुंब एकत्र येते. यामुळे एकमेकांबद्दल असलेले प्रेम, स्नेहाची भावना वाढीस लागते, असे आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी सांगितले. राज्‍यातील जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थनाही त्‍यांनी केली.

आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्‍या की, बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. सत्तरीतील जनतेला सुख-समृद्धी मिळो तसेच सत्तरीच्या विकासासाठी वेळोवेळी आम्हाला आशीर्वाद देत राहो. कोणतेही शुभ काम करताना आम्ही गणेशाची उपासना करतो. हा उत्सव आनंद देणारा आहे.

पालखीतून आणली जाते गणेशमूर्ती

विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या बाजूलाच राणे यांचा राजवाडा आहे. पूर्वपरंपरेनुसार गणेश चतुर्थीसाठी राणे घराण्याची गणेशमूर्ती ही विठ्ठलापूर येथील गावकऱ्यांकडून पालखीतून आणली जाते. मूर्ती पालखीतून विधीवतपणे घरात आणल्यानंतर ब्राह्मणाकरवी शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले जाते. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी श्री गणेशाची पूजा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT