Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

Kumar Kushagra Century India A vs Australia A 2026: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या युवा खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची चर्चा सुरु असून, एका नव्या उदयोन्मुख ताऱ्याने राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली.
Kumar Kushagra Century
Kumar Kushagra CenturyDainik Gomantak
Published on
Updated on

Kumar Kushagra Century India A vs Australia A 2026: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या युवा खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची चर्चा सुरु असून, एका नव्या उदयोन्मुख ताऱ्याने राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली. सध्या ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर असून पुदुच्चेरी येथे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात मल्टी-डे कसोटी सामना खेळला जात आहे. देवदत्त पडिक्कलच्या नेतृत्वाखालील इंडिया अ संघाने पहिल्या डावात अत्यंत संस्मरणीय फलंदाजी केली, ज्यामध्ये अवघ्या 21 वर्षांच्या कुमार कुशाग्र या युवा यष्टीरक्षक-फलंदाजाने आपल्या दमदार शतकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत आणि दर्जेदार गोलंदाजी आक्रमण असलेल्या संघासमोर हे शतक झळकावून कुशाग्रने आगामी भारतीय कसोटी संघात आपली दावेदारी मजबूत केली.

सामन्याच्या सुरुवातीला भारताने (India) पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीवीर साई सुदर्शनने 57 धावांची जिगरबाज खेळी खेळत पाया रचला. मात्र, अमन मोखाडे, कर्णधार देवदत्त पडिक्कल, शेख रशीद आणि यश राठोड यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. अशा बिकट परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुमार कुशाग्रने संघाची धुरा सांभाळली. त्याने तनुष कोटियान आणि त्यानंतरच्या इतर फलंदाजांसोबत अत्यंत मोक्याच्या भागीदारी केल्या. या 21 वर्षीय युवा खेळाडूने 240 चेंडूंचा सामना करत 12 चौकारांच्या मदतीने 133 धावांची तूफानी खेळी खेळली.

Kumar Kushagra Century
Team India World Record: टीम इंडियाचा 'भीमपराक्रम'! टी-20 क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत ठरला जगातील पहिलाच संघ; रोमहर्षक सामन्यात जपानचा पराभव

या सामन्यात इंडिया अ संघाने पहिल्या डावात एकूण 334 धावा केल्या, ज्यामध्ये कुशाग्रच्या शतकासोबतच साई सुदर्शनच्या 57 आणि तनुष कोटियानच्या 138 चेंडूंतील 69 धावांचेही मोठे योगदान राहिले. भारतीय कसोटी संघ सध्या ट्रांजिशन फेजमधून जात असताना, मधल्या फळीत आणि यष्टीरक्षक म्हणून नव्या पर्यायांचा शोध घेतला जात आहे. सध्या भारताकडे सहाव्या क्रमांकावर ध्रुव जुरेल हा उत्तम पर्याय उपलब्ध असून सर्फराज खानही दावेदार आहे, परंतु कुमार कुशाग्रचे वय अवघे 21 वर्षे असल्याने तो दीर्घकालीन भविष्याचा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.

Kumar Kushagra Century
Team India Players Retirement: रोहित शर्मा, मोहम्मद शमी... युवा खेळाडूंची एन्ट्री, दिग्गजांची एक्झिट! 2026 मध्ये टीम इंडियाचे 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती?

कुशाग्रची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी अत्यंत उत्कृष्ट राहिली असून त्याने 36 सामन्यांत 41.73 च्या सरासरीने 2337 धावा केल्या आहेत. यात 6 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही त्याने पूर्व विभागासाठी खेळताना शानदार शतक ठोठावले होते आणि आता ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध असाच करिष्मा करुन दाखवला. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि जिद्दी कामगिरीमुळे निवडकर्त्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले असून, आगामी काळात तो ध्रुव जुरेलचा बॅकअप म्हणून कसोटी संघात स्थान मिळवण्यास प्रबळ दावेदार मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com