Goa EV Subsidy  Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारची तिजोरी रिकामी, म्हणून EV Subsidy मिळण्यास होतोय विलंब; काँग्रेसचा आरोप

EV Subsidy: गोव्यात पर्यायी वीजनिर्मिती वाढवण्यात तसेच ई वाहनांना चालना देण्यात मंत्री सपशेल अपयशी ठरलेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरकारने ‘ईव्ही’ खरेदीवर सबसिडी लागू केली आहे, त्यामुळे ऑगस्ट २०२२ पासून आजपर्यंत ईव्ही अनुदानासाठीचे किती अर्ज मंजूर झाले आणि किती रक्कम वितरित झाली, किती अर्ज प्रलंबित आहेत याची माहिती जनतेसमोर आणावी.

सरकारच्या दिवाळखोरीमुळे ही सबसिडी ईव्ही मालकांना वेळेवर देण्यास सरकारला अपयश आले आहे, अशी टीका काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

ईव्ही वाहनासाठीच्या प्रक्रियेच्या सर्व औपचारिकता पूर्ण केलेले बहुतेक महिलांचा समावेश असलेले अनेक अर्ज गेल्या अनेक महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध नसल्यामुळे रक्कम वितरण प्रलंबित असल्याचे अर्जदारांना सांगितल्याचा दावा करून अनुदान योजनेच्या आडून अर्जदारांकडून फक्त शुल्क वसूल केले, असा आरोप पणजीकर यांनी केला.

...तर आंदोलन छेडू!

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्यामार्फत हे अनुदान देण्यात येणार आहे. मात्र या खात्याचे मंत्री ही रक्कम वाहन चालकांना वेळेत देण्यास अपयशी ठरले आहेत. सरकारी तिजोरीतच हे अनुदान देण्यासाठी रक्कम नसल्याने ती देण्यास विलंब होत आहे.

गोव्यात पर्यायी वीजनिर्मिती वाढवण्यात तसेच ई वाहनांना चालना देण्यात मंत्री सपशेल अपयशी ठरलेत. गोव्यात ईव्ही चार्जिंग स्टेशन पुरेशी नसल्याने ई -वाहनधारकांना चार्जिंगची समस्या भेडसावत आहे. सरकार फक्त घोषणा करत आहे, परंतु प्रत्यक्षात काहीच होत नाही.

सर्व प्रलंबित अर्जांचे अनुदान वितरण सरकारने तातडीने करावे, अशी काँग्रेसची मागणी आहे, मात्र ती पूर्ण करण्यास सरकार अपयशी ठरल्यास काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा पणजीकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT