Ladfe waterfall ban  Dainik Gomantak
गोवा

Goa Waterfall Ban: गोव्यातील 'या' प्रसिद्ध धबधब्यावर जाण्यास बंदी! धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी निर्णय

Kalaskond waterfall ban Ladfe: धार्मिक महत्व असलेल्या डिचोली तालुक्यातील लाडफे येथील ‘कळसकोंड’ धबधब्यावर यंदाही पर्यटनासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.

Sameer Panditrao

डिचोली: धार्मिक महत्व असलेल्या डिचोली तालुक्यातील लाडफे येथील ‘कळसकोंड’ धबधब्यावर यंदाही पर्यटनासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. तसा निर्णयही श्री सातेरी केळबाई देवस्थान समितीने घेतला आहे. पाऊस सक्रिय झाल्याने या धबधब्यावर पर्यटकांची वर्दळ सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून या धबधब्याकडे जाणारी वाट अडविण्यात आली आहे.

‘कळसकोंड’ परिसराचे धार्मिक पावित्र्य जपून ठेवण्यासाठी देवस्थान समितीने यंदाही या धबधब्यावर पर्यटकांना प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

पाऊस सक्रिय झाला की, विविध भागात धबधब्यांचा खळखळाट सुरु होतो. काही धबधब्यांवर पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी उसळते. लाडफे येथील ‘कळसकोंड’ धबधबा घसघसू लागला, की हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करू लागतो.

पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी विविध भागातून अनेकजण या धबधब्यावर येतात. मद्यप्राशन करुन धांगडधिंगाणा घालण्याचे तसेच अस्वच्छता करण्याचे प्रकारही यापूर्वी या धबधबा परिसरात घडले आहेत. काही वर्षांपूर्वी तेथील चिरेखाणीत बुडून एका बालकाचा दुर्दैवी अंत झाला होता. या साऱ्या प्रकारावर नियंत्रण यावे.

धार्मिक परिसराचे पावित्र्य जपून रहावे. या हेतूने या धबधब्यावर पावसाळी पर्यटनाला प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे. प्रतिबंध असतानाही या धबधब्यावर कोणी अरेरावी केल्यास त्यांच्यावर वेळप्रसंगी कारवाई करण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.

धबधब्याला धार्मिक महत्व

ज्याठिकाणी ‘कळसकोंड’ धबधबधबा वाहतो, त्या परिसराला मोठे धार्मिक महत्त्व आहे. त्याठिकाणी देवतांच्या मूर्ती विसर्जित केल्या आहेत. गावात दरवर्षी साजरा होणाऱ्या कळसोत्सवावेळी कळसकोंड तळीचे पाणी पवित्र तीर्थ मानून घरोघरी देण्यात येते, अशी माहिती देवस्थान समितीकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT