Sattari Waterfall: ट्रेकिंगची आवड आहे? सत्तरीतील 'या' छुप्या धबधब्यांना भेट द्या; मान्सूनमध्ये करा 'जीवाचा गोवा'

Sattari Waterfalls Goa: उत्तर गोव्यातील सत्तरी तालुका हा अशा अनेक मनमोहक धबधब्यांचं माहेरघर आहे, जे केवळ पावसाळ्यातच जिवंत होतात
Hidden Waterfalls Goa
Hidden Waterfalls GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Travel Guide: मान्सूनची चाहूल लागताच गोवा जणू काही कातच टाकतो. काही दिवसांपूर्वी उन्हानं तापणारा गोवा अचानक गिरवगार होतो. अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होतात. त्यांच्या झुळझुळत्या प्रवाहाचा आवाज आणि नयनरम्य दृश्य मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातात. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुका हा अशा अनेक मनमोहक धबधब्यांचं माहेरघर आहे, जे केवळ पावसाळ्यातच जिवंत होतात आणि या सत्तरीच्या वनक्षेत्राला पाणी आणि धुक्यानं भरलेलं एक जिवंत चित्र बनवतात.

चोरला घाटातील हिवरे गाव

चोरला घाटाच्या उत्तर-पूर्वेकडील पायथ्याशी वसलेले हिवरे हे छोटेसं गाव उंच डोंगररांगांनी वेढलेलं आहे. पावसाळ्याच्या प्रत्येक सरसरीसोबत हे गाव एखाद्या स्वप्नाप्रमाणे सुंदर बनतं. हिवरे गावात अनेक धबधबे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हिवरे धबधबा, जिथे पोहोचण्यासाठी घनदाट वनराईतून ६ ते ७ किलोमीटरचा अर्ध-मध्यम स्वरूपाचा ट्रेक करावा लागतो.

धबधब्यापर्यंत ट्रेक केल्यांनतर धुक्यानं आच्छादलेल्या टेकड्या आणि वाहणाऱ्या प्रवाहांचे विहंगम दृश्य अनुभवता येतं. हिवरे गाव तुम्हाला प्रत्येक क्षणात शांततेचा अनुभव देऊन जातं. सत्तरीतील हिवरे गाव पणजीपासून ५३ किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे सकाळी लवकर निघणं कधीही चांगलं.

Hidden Waterfalls Goa
Goa Travel Guide: 'गोवा ट्रिप' प्लॅन करताय?काय खायचं? कुठं जायचं? स्थानिकांसोबत संवाद कसा साधायचा? वाचा संपूर्ण माहिती

शहरापासून गावाकडे येणारा हा प्रवास आणि संपूर्ण मार्गावर असलेली हिरवळ एक आनंददायी अनुभव देते. गोव्याच्या सत्तरी तालुक्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत आणि मान्सून हा निसर्गाचे खरे सौंदर्य अनुभवण्याचा सर्वोत्तम काळ म्हटला जातो.

सालेली गाव

पणजीपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर सत्तरी तालुक्यातच सालेली नावाचं एक नयनरम्य गाव आहे. गोव्याच्या अंतर्गत भागातील निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी सालेली एक उत्तम ठिकाण आहे. मान्सूनमध्ये इथली जंगलं पूर्णपणे ताजेतवानी होतात आणि सालेलीला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असतो. सालेलीमध्ये अनेक नैसर्गिक झरे आणि छोटे धबधबे शोधता येतात.

एकदा तुम्ही गावातून वरच्या दिशेने प्रवास सुरू केला की, तुम्हाला एक वाहणारा धबधबा दिसेल. धबधब्यावर पोहोचल्यावर, तुम्हाला तिथे मनसोक्त डुबकी घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या मान्सूनमध्ये गोव्यातील ही निसर्गरम्य ठिकाणे नक्कीच अनुभवण्यासारखी आहेत, जिथे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शांतता आणि ताजेपणाचा अनुभव घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com