Baga Restaurant Fire:  Dainik Gomantak
गोवा

Baga Restaurant Fire: बागा येथील रेस्टॉरंटला लागली आग; सोफा, लॅपटॉप, एसी जळून खाक

Akshay Nirmale

Baga Restaurant Fire: देशविदेशातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या बागा बीच परिसरात आज गुरूवारी सकाळी एका रेस्टॉरंटमध्ये अचानक आग लागली. व्हिक्टर बार अँड रेस्टॉरंट असे या रेस्टॉरंटचे नाव आहे.

या आगीत रेस्टॉरंटमधील सोफासेट, एसी, लॅपटॉप असे साहित्य जळून खाक झाले आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीत रेस्टॉरंटचे एकूण पन्नास हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुमारे एक लाखाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचले.

अग्निशमन दलाच्या पथकात पी. जे. कन्नाईक, एन. ए. चोडणकर, डी. पी. चारी, पी. आर. मांद्रेकर, पी. जे. एन. गावकर, एस. टी. गावकर, सी. बी. नाईक यांचा समावेश होता.

सकाळी 07 वाजून 13 मिनिटांनी अग्निशमन दलाला याची खबर मिळाली होती. सकाळी 09 वाजेपर्यंत अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT