Bad condition of IRB police during the journey Dainik Gomantak
गोवा

आयआरबी पोलिसांचे प्रवासादरम्यान हाल

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल: सरकार निर्दयी बनल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी तैनात केलेल्या गोव्यातील राखीव पोलिसांच्या तुकडीच्या मतदानावरून राज्यात जोरदार घमासान सुरू आहे. 10 मार्च रोजी राज्यात मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी या 413 पोलिसांनी मतदान करणे सरकारला गरजेचे वाटत असल्याने त्यांच्या बदल्यात नवीन पोलिस पाठवून या पोलिसांना रस्तामार्गे गोव्यात आणण्यात येत आहे. साधारणपणे दोन हजार किलोमीटरचा प्रवास पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मात्र प्रचंड डोकेदुखीचा विषय ठरला आहे. यावर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले असून सरकार निर्दयी बनल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत त्यांनी केला आहे.

राज्यांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांना इतर राज्यांतही सेवेसाठी जावे लागते. उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यात निवडणुकीसाठी अनेक राज्यांतून पोलिस तैनात केले आहेत. याचाच एक भाग म्हणून गोवा पोलिस दलाच्या भारतीय राखीव दलाच्या काही तुकड्या उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत. यादरम्यान गोव्यात विधानसभेची निवडणूक झाली असून सध्या ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची मतदान प्रक्रिया सुरू आहे.

यापैकी 413 पोलिस कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला नाही, हे राज्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर तातडीने पावले उचलत संबंधित पोलिसांच्या बदली दुसरे पोलिस तैनात करून या पोलिसांना मतदानापूर्वी गोव्यात आणण्यात येत आहे. यासाठी पाठवलेले पोलिस उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले असून उत्तर प्रदेशमधून पूर्वीचे कर्मचारी गोव्यात येत आहे.

दैनंदिन गरजांनाही मुकावे लागले

पोलिसांची ने-आण करण्यासाठी कदंब ट्रान्सपोर्ट महामंडळाच्या बसेस वापरल्या आहेत. हा प्रवास लांबचा असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रचंड डोकेदुखीचा बनला आहे. या प्रवासादरम्यान या पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अगदी आंघोळ, जेवण यासारख्या दैनंदिन बाबींनासुद्धा मुकावे लागत असल्याने हे कर्मचारी वैतागले आहेत. याबाबत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने सरकारला जाब विचारत या पोलिसांना बसऐवजी इतर सोयींचा विचार केला पाहिजे होता, असा आग्रह धरत सरकारवर टीकेचा भडिमार केला.

याबाबत पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांच्याशी माझी चर्चा झाली असून या पोलीस कर्मचाऱ्यांना परतीच्या प्रवासात बसगाड्यांऐवजी अन्य प्रवासाच्या साधनांचा उपयोग करावा, अशी मागणी आम्ही केली आहे.

- दिगंबर कामत,

हे सरकार अत्यंत निर्दयी बनले असून त्यांनी माणुसकी सोडली आहे. पोलिस कर्मचारीसुद्धा माणसेच आहेत. दोन हजार किलोमीटरचा सलग चार दिवसांचा प्रवास ते करत आहेत. हे नियोजनशून्य कारभाराचे लक्षण आहे.

- दुर्गादास कामत,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT