bacchu kadu Dainik Gomantak
गोवा

Bachchu Kadu : पुन्हा गुवाहाटी करायला लावू नका; बच्चू कडूंचा भाजपाला नाव न घेता इशारा

शपथविधी सर्वांना घेऊन करायला हवा होता अशी खंत व्यक्त केली

दैनिक गोमन्तक

Bachchu Kadu In Goa : महाराष्ट्रात घडत असलेले राजकारण सामान्य जनतेच्या बुद्धीबाहेरचे आहे. त्यामुळे जनता संभ्रमित झाली आहे, असे मत महाराष्ट्रातील माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

दिव्यांगांचे केंद्रीय पातळीवरचे संघटन करण्यासाठी बच्चू कडू आपल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह गोव्यात आले आहेत. त्यांनी स्थानिक दिव्यांग संघटनांशी चर्चा केली.

महाराष्ट्रात हे घडत आहे ते लोकांच्या बुद्धीच्या बाहेरचे आहे. याला लोक त्रासलेले आहेत. यातून वाईट काही घडू नये इतकीच अपेक्षा. आपल्या पक्षहितासाठी आधी सोबत घेतलेल्यांना नाराज करण्याचे काम काहीजण करत आहेत. शपथविधी करायचाच होता तर तो सर्वांना घेऊन करायला हवा होता, अशी टीका भाजपाचे नाव न घेता कडू यांनी केली. पुन्हा गुवाहाटी करायला लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

2024 मध्ये बदल घडेल

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता कोणाला निवडून देईल व भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांचे एकत्रीकरण कसे होईल? यावरतीच केंद्रातील सत्ता अवलंबून आहे.

केंद्रातील सत्ता बदलल्यास महाराष्ट्र आणि इतर राज्यांतही मोठे बदल होतील, असा अंदाजही कडू यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि भारत राष्ट्र समितीच्या वतीने महाराष्ट्रात निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT