Mahadayi River : म्‍हादई नदीचे पाणी वळवण्‍यासाठी कर्नाटकच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद

सत्तारूढ काँग्रेस सरकारचा आज अर्थसंकल्‍प सादर झाला
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Budget 2023 : कळसा आणि भांडुरा प्रकल्‍पांसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला नवा आराखडा सादर केल्‍यानंतर कर्नाटकातील नवनिर्वाचित सिद्धरामय्‍या सरकारने उपनद्यांचे पाणी वळविण्‍यासाठी आज 1 हजार कोटींची तरतूद केली आहे.

सत्तारूढ काँग्रेस सरकारचा आज अर्थसंकल्‍प सादर झाला. त्‍यात म्‍हादईच्‍या मुद्यावर आपण गंभीर असल्‍याचे सरकारने दाखवून दिले आहे. गोव्‍यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे.

Mahadayi Water Dispute
Valpoi News : अडवईत नैसर्गिक पद्धतीने भाजी लागवड; सयाजी देसाई यांची स्वयंरोजगाराकडे वाटचाल

डिसेंबर 2022 मध्‍ये कर्नाटकच्‍या नव्‍या ‘डीपीआर’ला केंद्र सरकारने मान्‍यता दिल्‍यानंतर गोव्‍यात गहजब माजले होते. सावंत सरकारने ‘डीपीआर’ मागे घेण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे अधिवेशनात आश्‍‍वासन दिले होते.

तथापि, प्रत्‍यक्षात कोणतेही पाऊल उचललेले नाही. दुसरीकडे कर्नाटकने म्‍हादईच्‍या पाण्‍यासाठी सातत्‍याने आक्रमक भूमिका घेतली आहे.

आज सिद्धरामय्‍या म्‍हणाले, ‘म्हादई’वरील प्रकल्पांचे काम पर्यावरण मंत्रालयाच्या आवश्यक त्या परवानग्‍या मिळाल्यानंतर सुरू केले जाईल. पेयजल प्रकल्पासाठी म्हादई जल लवादाने 3.90 टीएमसी पाणी वापरण्यास आधीच मंजुरी दिली आहे’. सत्तेत आल्‍यास म्‍हादईवरील प्रकल्‍पांसाठी भरीव निधीची तरतूद करू, अशी ग्‍वाही काँग्रेसने दिली होती. त्‍याची पूर्तता केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com