National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games 2023 Goa: धावता-धावता थेट सुवर्णपदकापर्यंत!

National Games 2023 Goa: बाबू गावकरची ध्येयपूर्ती: घरच्या मैदानावर ठरला गोव्यासाठी ‘सुपरस्टार’

Kishor Petkar

National Games 2023 Goa: बाबू गावकर लहानपणापासून धडपड्या आणि चपळ, सतत धावत राहणारा मुलगा. अंगणात पळण्यास सुरवात केल्यानंतर तो रस्त्यावरून धावू लागला, तेथून थेट मिनी-मॅरेथॉनचा मार्ग धरला आणि अखेरीस धावण्यातील कौशल्याच्या जोरावर ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गोव्यासाठी पहिला पदकविजेता बनला, तेही सुवर्णपदक. सोनेरी यशासह बाबू राज्याचा ‘सुपरस्टार’ ठरला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन होण्यास काही तास बाकी असताना २२ वर्षीय बाबूने फोंड्यातील क्रीडा संकुलात इतिहास रचला.

मॉडर्न पेंटॅथलॉनमधील लेझर रन प्रकारात तो अव्वल ठरला. धावणे व शूटिंग (नेमबाजी) त्याने वेग आणि अचूकता यांचा सुरेख संगम साधला.

21 वेळा मिनी मॅरेथॉन विजेता

धावणे हा बाबूचा छंद. केपे सरकारी महाविद्यालयात त्याने गतवर्षी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शालेय-महाविद्यालयीन पातळीवर वेगवेगळ्या शर्यतीत तो अव्वल ठरला.

गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्याने १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. ‘वडिलांनी आर्थिकबाबतीत सर्व गरजा पूर्ण केल्या. त्या पाठिंब्यामुळेच मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू शकलो’, असे तो म्हणाला.

वाढदिनी ‘गोल्डन गिफ्ट’ : नेत्रावळी या ग्रामीण भागातील बाबू गावकर याचा आज २२ वा वाढदिवस. आयुष्यातील हा दिवस अविस्मरणीय ठरविताना त्याने राज्याला ‘गोल्डन गिफ्ट’ दिले. ‘वाढदिनी काही तरी भव्य दिव्य करण्याचा माझा निश्चय होता, तो साध्य झाल्याचा मला अभिमान आहे,’ असे तो म्हणाला.

लेझर रन म्हणजे काय?

1 मॉडर्न पेंटॅथलॉन खेळातील लेझर रन हा एक प्रकार

2 लेझर रनमध्ये स्पर्धक ६०० मीटर अंतराच्या ५ फेऱ्या धावतो.

3 प्रत्येक फेरीत थांबून १० मीटर अंतरावरून ४ वेळा ५ लक्ष्यावर लेझर पिस्तुलाद्वारे नेम साधतो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT