Goa Culture: पार्से-तुये श्री भगवती देवी पुनर्भेट उद्या तरंगोत्सव सोहळा

Goa Culture: वाड्यावाड्यांवर उभारल्‍या भव्य प्रवेश कमानी
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak

Goa Culture: तुये आणि पार्से गावचे ग्रामदैवत श्री देवी भगवती भगिनींचा पुनर्भेट तरंगोत्सव सोहळा शुक्रवार, 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. यानिमित्ताने दोन्ही गावांत जय्यत तयारी सुरू आहे. यंदा या उत्सवाचा मार्ग बदलण्यात आला आहे.

Goa Culture
Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्‍या मुख्य मार्गावर गुजराती भाषेत होर्डिंग्‍ज

पार्से येथून श्री देवीचा कलश आणि तरंगे यंदा वायडोंगरमार्गे तुये गावात प्रवेश करणार असल्याने कळस आणि तरंगांच्या स्वागतासाठी वाड्यावाड्यांवर भव्य प्रवेश कमानी उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

गेल्या शेकडो वर्षांच्या परंपरेचा भाग असलेला हा उत्सव दोन्ही गावांसाठी एक मोठी पर्वणी असते. दर तीन वर्षांनंतर हा सर्वांत मोठा उत्सव साजरा होतो. या सणानिमित्त दोन्ही गावांतील असंख्य भक्तगण देवीच्या कळसाचा कौल आणि तरंगांचे दर्शन घेण्यासाठी एकत्र गर्दी करतात. गुरवाच्या डोक्यावर श्री देवी भगवतीचा कलश आणि सोबत तरंगे अशी ही मिरवणूक पारंपरिक मार्गाने यंदा 27 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास निघणार आहे.

वाटेत शेकडो भक्तगण कलश आणि तरंगांचे दर्शन घेतात. तुये येथे सीमेवर तुये ग्रामस्थांतर्फे 28 रोजी मध्यरात्री कलश आणि तरंगांचे विधिवत स्वागत केले जाते. तिथून हा कलश आणि तरंगे तुये गावात नेली जातात. 28 रोजी पहाटे तुयेतील श्री देवी भगवती मंदिरात कलश आणि तरंग दाखल होतात. तिथे दिवसभर भक्तांना कलश आणि तरंगांचे दर्शन घेता येते. यानिमित्ताने विविध धार्मिक विधी होतात.

धूमधडाक्यात आयोजन

28 रोजी संध्याकाळी तुयेतून कलश आणि तरंगे परत आपल्या मूळ पार्से मंदिरात नेली जातील. यंदाचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार असून सर्व महाजन, भक्तमंडळींनी सहकार्य करावे, असे आवाहन तुये श्री भगवती पंचायत समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर तुयेकर यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com