

सांगे: सांगे तालुक्यातील धानोळे-केवण-रिवण येथील श्री दक्षणा देवी मंदिरात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली असून देवीच्या अंगावरील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
स्थानिक नागरिक आनंद गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर सोमवारी सकाळी पूजेनंतर देवीला सुवर्ण अलंकार परिधान केले जातात व रात्री आरतीनंतर ते काढले जातात. सोमवारी सकाळी नियमित पूजा करून पुजारी गेल्यानंतर दुपारच्या सुमारास मंदिर परिसरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दागिन्यांवर हात साफ केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सायंकाळी मंदिरात गेलेल्या भाविकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर तत्काळ केपे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सांगे भागात तसेच लोकवस्तीपासून दूर असलेल्या मंदिरे, घरे आणि वृद्ध व्यक्ती राहतात अशा ठिकाणी चोरट्यांकडून रेकी करून चोरीचे प्रकार वाढत असल्याची चर्चा आहे.
कोलवा समुद्रकिनाऱ्यावर रविवारी एका पर्यटकाची बॅग चोरून पळून जाणाऱ्या दोन संशयितांना पर्यटक पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. प्रभू अशोक चौहान व राजू पंडीवाडा अशी या संशयितांची नावे आहेत. या दोघांना मागाहून कोलवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चोरीला गेलेली बॅग जप्त केली आहे. कोलवा किनाऱ्यावर दर रविवारी पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी चोरटे किनाऱ्यावर फिरत असल्याने पर्यटक पोलिसांनी पाळत ठेवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.