Tobacco Eradication: तंबाखू निर्मूलनासंबंधी होणार जनजागृती Dainik Gomantak
गोवा

तंबाखू निर्मूलनासंबंधी होणार जनजागृती

दक्षिण गोव्यात सिगरेट व इतर तंबाखू उत्पादनांचा लोक किती प्रमाणात सेवन करतात व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय अंमलबजावणी गट काय करतात व त्यांनी काय करावे यावर चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: दक्षिण गोवा जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण (Tobacco Eradication) समन्वय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कचेरीत झाली. या बैठकीत तंबाखू सेवन नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला. दक्षिण गोव्यात सिगरेट व इतर तंबाखू उत्पादनांचा लोक किती प्रमाणात सेवन करतात व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय अंमलबजावणी गट काय करतात व त्यांनी काय करावे यावर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक होते. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन, पंचायत, शिक्षण व पर्यटन संचालनालयांनी काय पावले उचलली आहेत याची माहिती जिल्हाधिकारी नाईक यानी दिली. डीएलसीसीचे सदस्य सचिव डॉ. सारा जॉर्ज यांनी सांगितले की तंबाखू निर्मूलन मोफत शैक्षणिक संस्थाना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आलेय. हे प्रशिक्षित लोक शाळांमध्ये जाऊन तंबाखू निर्मूलनासंबंधी जागृती करणार आहेत. नगरपालिकांत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनाही यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाईल.

गोवा कॅनचे संयोजक रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले की गुटखावर बंदी असूनही तो सर्वत्र उपलब्ध आहे. गुन्हा शाखा व कोकणी रेल्वे पोलिसांनी तंबाखू, गुटखा किती जप्त केलाय व काय कारवाई केली याची माहिती देण्याची मागणी त्‍यांनी केली. दक्षिण गोव्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर कोटपा (सीओटीपीए) नियमन 4 खाली सर्व खबरदारी घेण्याचे आदेश दिले जातील असे मडगाव रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक प्रशांत गाड यांनी सांगितले. पंचायत खात्याच्या उपसंचालक स्वाती दळवी यांनीही विचार मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT