Shramdham scheme Goa Dainik Gomantak
गोवा

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Shramdham House Goa: केपे तालुक्यातील कोठंबी–अवेडे या गावातील आनंदु दत्ता प्रभुदेसाई हे वयाची पंचाहत्तरी गाठलेले गृहस्थ हृदयविकाराच्या झटक्याने अंथरुणावर खिळलेले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद: ‘श्रमधाम’ संकल्पनेतून गावठणवाडा, कोठंबी (अवेडे) केपे येथील आनंदु प्रभुदेसाई यांच्या कोसळलेल्या घराचे पुनर्बांधकाम केवळ १५ दिवसांत पूर्ण करण्यात आले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे १९ रोजी संध्याकाळी मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या हस्ते या घराच्या चावीचे वितरण करण्यात येईल.

केपे तालुक्यातील कोठंबी–अवेडे या गावातील आनंदु दत्ता प्रभुदेसाई हे वयाची पंचाहत्तरी गाठलेले गृहस्थ हृदयविकाराच्या झटक्याने अंथरुणावर खिळलेले आहेत. एकेकाळी ते खनिज वाहतूक करणारे ट्रकचालक होते.

त्यांचे आयुष्य कष्टात गेले. त्यांचे जुने वडिलोपार्जित मातीचे घर, काळाच्या ओघात झिजून कोसळले. ज्या दिवशी संपूर्ण गाव गणेशोत्सवाच्या पूजेकरिता ‘श्री गणपती मंदिरात’ रमलेले होते, त्याच दिवशी दुर्दैवाने आनंदु अंथरुणावर असताना घर कोसळले होते.

३ आक्टोबर रोजी भूमिपूजन

३ ऑक्टोबर रोजी श्रमधाम संकल्पनेअंतर्गत या घराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, ४ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कार्यात बिंदया संतोष प्रभुदेसाई ,दत्तराज राऊत देसाई, रसिक प्रभुदेसाई, विठ्ठल प्रभुदेसाई, विक्रांत प्रभुदेसाई, दिपेश प्रभुदेसाई, दिक्षा प्रभुदेसाई, मयुर प्रभुदेसाई, बाळा प्रभुदेसाई, कुणाल प्रभुदेसाई, आशिष प्रभुदेसाई, कौशिक प्रभुदेसाई, उपेंद्र प्रभुदेसाई, ऋषिकेश प्रभुदेसाई, कृष्ण प्रभुदेसाई, भूमी प्रभुदेसाई यांनी हातभार लावला.

श्रमधाम ही केवळ योजना नाही, तर समाजाची चळवळ आहे. प्रत्येक वेळी असे घर उभे राहते त्यावेळी जाणवते की, जिथे श्रम आहे, तिथेच सन्मान आणि जिथे सन्मान आहे, तिथेच माणुसकीचा विजय आहे.

रमेश तवडकर, मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Goa Live Updates: सांकवाळ येथे फ्लॅटमध्ये चोरी; 8 लाखांचा ऐवज लंपास

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

SCROLL FOR NEXT