Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गावडेंच्या डावपेचाला बळी पडू नये! प्रियोळात बळकट व्‍हावे; भाजप नेत्यांचे मत

Govind Gaude: प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी भाजपचे नेते व सरकारवर टीका करणे सुरुच ठेवल्यास त्यांना समजेल अशा शब्दांत तिखट प्रत्युत्तर द्यावे यावर भाजपमध्ये विचार सुरू झाला आहे.

Sameer Panditrao

पणजी: प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी भाजपचे नेते व सरकारवर टीका करणे सुरुच ठेवल्यास त्यांना समजेल अशा शब्दांत तिखट प्रत्युत्तर द्यावे यावर भाजपमध्ये विचार सुरू झाला आहे.

भाजपमधून आपली हकालपट्टी व्हावी, असे गावडे यांचे प्रयत्न असल्याचे भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांचे म्हणणे असून त्यांच्या या डावाला बळी न पडता प्रियोळमध्ये भाजप पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देण्याचेही ठरवण्यात आले आहे.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने अनौपचारिकरित्या सांगितले, की गावडे एका बाजूने आरोप करत सुटल्यास आणि त्याला सरकार किंवा पक्षाने उत्तर न दिल्यास गावडे यांचे म्हणणे जनतेला खरे वाटू शकते, अशी भीती पक्षांतर्गत चर्चेत व्यक्त करण्यात आली आहे. गावडे यांच्यावर आरोप केल्यास ते भाजपचे आमदार आहेत आणि मंत्रीही होते. त्यामुळे आपल्यास सरकारवर टीका केल्यासारखे होणार आहे, असाही मुद्दा चर्चेत आला आहे.

गावडे यांनी नाव घेऊन आरोप करण्यापर्यंत थांबावे, की त्यांना आताच बोलावून समज द्यावी यावर अद्याप मतैक्य झालेले नाही. गावडे यांनी आरोप केलेल्या कालावधीत खासदार सदानंद शेट तानावडे प्रदेशाध्यक्ष होते. आताचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक त्यावेळी प्रदेश सरचिटणीस होते.

ते दोघेही महत्वाचे पदाधिकारी गावडे यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केले, असा आरोप करूनही काहीच बोलले नाहीत, याविषयीही कार्यकर्त्यांत चर्चा सुरू आहे. गावडे यांचे काय करायचे हा भाजपसमोरील कठीण प्रश्न आताच्या घडीला आहे. मंत्रिमंडळात असेपर्यंत गावडे यांना मंत्रिमंडळात काढण्याची कारवाई करता येत होती. ती कारवाई झाल्याने आता पुढे काय कारवाई करायची हाही प्रश्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT