Govind Gaude: हस्तांदोलन झालं, पण संवाद नाही! मंत्रिपदावरुन हटवल्यानंतर गावडे मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर

Pramod Sawant Meet Govind Gaude: आदिवासी कल्याण खात्याच्या कामकाजावरून थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केल्यानंतर माजी मंत्री गोविंद गावडे यांना अखेर मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Pramod Sawant Meet Govind Gaude
Pramod Sawant Meet Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आदिवासी कल्याण खात्याच्या कामकाजावरून थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केल्यानंतर माजी मंत्री गोविंद गावडे यांना अखेर मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवल्याचा निर्णय सत्ताधारी गटात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.

गावडे यांनी रविवारी (२२ जून) माशेल येथे आयोजित एका बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांसमोर भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री सावंत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला होता.

या घडामोडींनंतर मुख्यमंत्री सावंत आणि गोविंद गावडे यांची मंगळवारी (24 जून) पहिल्यांदाच समोरासमोर भेट झाली. निमित्त होतं अजीत कडकडे यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम.

Pramod Sawant Meet Govind Gaude
Goa News: सभापतीपद स्विकारणार का? काब्राल म्हणाले कोण पती? कसला पती? वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

सावंत आणि गावडे यांनी दोघांनी मंचावर हस्तांदोलन केलं, मात्र एकमेकांकडे न पाहिल्यासारखं केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे की, हा मतभेद फक्त राजकीय की वैयक्तिक पातळीवरही पोहोचला आहे?

हस्तांदोलन हे औपचारिकतेपुरतं मर्यादित राहिलं. कार्यक्रमात ते एकत्र बसले असले तरी दोघांमध्ये संवादाचा कोणताही प्रसंग घडला नाही.

Pramod Sawant Meet Govind Gaude
Goa Weather Update: गोव्यात संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाची शक्यता; सहा दिवस यलो अलर्ट

मुख्यमंत्र्यावर टिका

गावडे यांनी माशेल येथे बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांवर टिका केली होती.गावडे म्हणाले की, ''मुख्यमंत्री सावंत यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्यावर कलाकार अनुदान निधीच्या वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.

या आरोपांमुळे त्रस्त होऊन त्यांनी पुन्हा राजीनाम्याची तयारी दाखवली होती. त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परिस्थिती समजावून सांगून राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. पण त्यावेळी मुख्यमंत्री हसून गप्प राहिले होते."

गावडे यांनी माशेल येथे बैठकीत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी भाजपसोबतच राहणार आहे. आमदारकीचा राजीनामा देणार किंवा भाजप सोडणार असल्याच्या अफवा असून त्या खोट्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील ‘विकसीत भारत 2047’ आणि ‘विकसीत गोवा’ या संकल्पना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com