voter list reverification Dainik Gomantak
गोवा

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

voter list verification: मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीची (एसआयआर) ड्यूटी करण्यास थिवी बोज उपकेंद्रातील साहाय्यक अभियंत्याने कथित नकार दिला

Akshata Chhatre

म्हापसा: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीची (एसआयआर) ड्यूटी करण्यास थिवी बोज उपकेंद्रातील साहाय्यक अभियंत्याने (एई) कथित नकार दिला.

त्यामुळे उपजिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोलवाळ पोलिसांनी थेट उपकेंद्रावरून बुधवारी (दि.५) सायंकाळी त्या 'एई'स ताब्यात घेतले, विशेष बाब म्हणजे म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरा त्यास हजर केले, या घटनेमुळे सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे. विरोधी पक्षाने यावरून सरकारला घेरले आहे.

प्रतिसाद मिळत नसल्याचे पोलिसांनी उपजिल्ह्याधिकाऱ्यांना कळविले. मात्र कोणत्याही परिस्थितीत एईला ड्युटी जॉइंट करून घ्यायला हवीच. त्यामुळे एईला उपजिल्हाधिकारी कार्यालयात आणावे, असे स्पष्ट निर्देश पोलिसांना मिळाले होते.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रमाशी जे अधिकारी जोडलेले आहेत आणि ते अत्यावश्यक सेवेत काम करीत आहेत, त्यांना त्या कामापासून सरकारने त्वरित मुक्त करावे, निवडणूक कामाकडे दुर्लक्ष केल्याने वीज खात्यातील 'जेई'ला पोलिसांनी नेले असताना, वीज मंत्री काय करीत आहेत, असा सवाल करून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी वीज मंत्र्यांनी आता अशा प्रकारांवर अभ्यास करावा, असा उपरोधिक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT