Mizoram Assembly Elections Dainik Gomantak
गोवा

Assembly Election: चार राज्यांचा आज फैसला; निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

दैनिक गोमन्तक

Assembly Election: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा या चार प्रमुख राज्यांचा विधानसभेचा निकाल आज रविवारी लागणार आहे. तर मिझोरामचा निकाल 4 तारखेला जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने या निवडणुकीकडे उपांत्य सामना म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या निकालाकडे स्थानिक पातळीवरील राज्यातील प्रमुख पक्षांचे नेते कसे पाहतात, हे ‘गोमन्तक’ने जाणून घेतले.

काँग्रेसला चार राज्यांत नक्कीच चांगले यश मिळेल, असे स्पष्ट दिसते. लोकांचा कौल काँग्रेसच्या बाजूने असेल, कर्नाटकात ज्या पद्धतीने घडले त्यापद्धतीने येथेही काँग्रेस करिश्‍मा करेल. या निकालाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर निश्‍चित परिणाम होईल. काँग्रेस या निवडणुकीकडे सकारात्मकतेनेच पाहात आली आहे.
- गिरीश चोडणकर,
काँग्रेस कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्य. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाप्रकारे राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळी एक्झिटपोलने दाखविलेले अंदाज पूर्णपणे मतदारांनी खोटे ठरविले होते. काही एक्झिट पोल मॅनेजही असतात. त्यामुळे फारसा त्यावर विश्‍वास ठेवणे योग्य नाही. निकाल पूर्णपणे जाहीर झाल्यानंतरच लोकसभेच्या निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होईल की नाही याबाबत बोलणे उचित ठरेल.
- आमदार विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड पक्ष.
देशभर भाजपविरोधी वातावरण आहे. विरोधी पक्षांची आघाडी विविध मुद्दे घेऊन देशातील जनतेसमोर जात आहे. चार राज्यांच्या निवडणुकीत तृणमूलचा काहीही सहभाग नाही, परंतु लोकसभेच्यादृष्टीने या राज्यांचे निकाल इतर पक्षांना निश्‍चित दिशा देणारे ठरणार आहेत. मात्र, या राज्यांच्या निकालाचा 05 टक्के परिणाम होईल, असे आपणास वाटते.
- समील वळवईकर, राज्य निमंत्रक, तृणमूल काँग्रेस.
देशभर भाजपविरोधी वातावरण आहे. विरोधी पक्षांची आघाडी विविध मुद्दे घेऊन देशातील जनतेसमोर जात आहे. चार राज्यांच्या निवडणुकीत तृणमूलचा काहीही सहभाग नाही, परंतु लोकसभेच्यादृष्टीने या राज्यांचे निकाल इतर पक्षांना निश्‍चित दिशा देणारे ठरणार आहेत. मात्र, या राज्यांच्या निकालाचा 50 टक्के परिणाम होईल, असे आपणास वाटते.
- समील वळवईकर, राज्य निमंत्रक, तृणमूल काँग्रेस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT