Goa Politics: नोकरभरती घोटाळा तक्रारीची दखल न घेतल्‍यास न्‍यायालयात; एल्विस गोम्‍स

Goa Politics: गोव्‍यातील पीडब्‍ल्‍यूडी नोकरभरती घोटाळ्यावर दै. ‘गोमन्‍तक’ने उजेड पाडूनही आत्तापर्यंत गोव्‍यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्‍या काँग्रेस पक्षाचे आमदार तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसले होते.
Elvis Gomes
Elvis Gomes Dainik Gomantak

Goa Politics: गोव्‍यातील पीडब्‍ल्‍यूडी नोकरभरती घोटाळ्यावर दै. ‘गोमन्‍तक’ने उजेड पाडूनही आत्तापर्यंत गोव्‍यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्‍या काँग्रेस पक्षाचे आमदार तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसले होते.

Elvis Gomes
Dona Paula Jetty: ‘दोनापावला जेटीची निविदा रद्द करा’

मात्र, या प्रश्नावर आता काँग्रेस प्रदेश समिती आक्रमक होणार याचे स्‍पष्‍ट संकेत काँग्रेस नेते एल्विस गोम्‍स यांनी दिले असून हा नोकरभरती घोटाळा राष्‍ट्रीय स्‍तरावर गाजलेल्‍या ‘व्‍यापम’ घोटाळ्‍यासारखाच असल्याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले आहे.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना गोम्‍स म्‍हणाले, कदाचित काँग्रेसच्‍या आमदारांनी हा विषय आवश्‍‍यक त्‍या गंभीरतेने लावून धरलेला नसेलही. मात्र, प्रदेश समिती याबद्दल कधीही स्‍वस्‍थ बसली नव्‍हती. काँग्रेस नेत्‍यांनी यापूर्वीच दक्षता खात्‍याकडे याबद्दल तक्रार केलेली आहे.

Elvis Gomes
Goa Politics: आलेक्स सिक्वेरांनी गाठली थेट दिल्ली

दै. ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी आज गोम्‍स यांची मुलाखत घेतली. यावेळी गोव्‍यात काँग्रेस झोपली आहे का असा थेट सवाल त्‍यांना विचारला असता ते म्‍हणाले, काँग्रेस झोपली आहे असे वाटत असले तरी आता त्‍यात बदल होणार आहे.

काँग्रेसचे प्रभारी मणिक्कम टागोर यांनी काल जी बैठक घेतली त्‍यातून गोव्‍यातील काँग्रेसने पुढची वाटचाल कशी करावी याचा आराखडा तयार करण्‍यात आलेला आहे. येत्‍या काही दिवसांतच काँग्रेस पूर्ण जोमाने मैदानात उतरणार याची खात्री तुम्‍ही बाळगा.

तळागाळात जाऊन काँग्रेस पक्षाची फळी पुन्‍हा बांधून काढली जाणार आहे. मी स्‍वत: यासाठी प्रयत्‍नशील असेल, असे ते म्‍हणाले.

सरकारविरोधात असंतोष

गोव्‍यात जे भाजप सरकार आहे ते सामान्‍य गोवेकरांच्‍या अपेक्षा पूर्ण करणारे नाही. उलट सामान्‍य गोमंतकीयांना या सरकारने संकटात लाेटले आहे याची जाणीव सर्वांना आहे. त्‍यामुळे लोकांमध्‍ये या सरकारच्‍या विराेधात असंतोषाचे वातावरण आहे. या असंतोषाला वाट करून देण्‍याचे काम आता काँग्रेस करेल, असे एल्विस गोम्स म्‍हणाले.

...तर अनेकजण गजाआड

आम्‍ही आता लोकायुक्‍तांकडे आमची तक्रार घेऊन जाणार आहोत. यातूनही काही झाले नाही, तर आम्‍ही न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावण्‍यास मागेपुढे पाहणार नाही. कारण ही नोकरभरती म्‍हणजे गोमंतकीय युवकांवर केलेला अन्‍याय आहे आणि या घोटाळ्‍याचा जर गंभीरपणे पाठपुरावा केला नाही, तर ‘व्‍यापम’ घोटाळ्‍यात जसे अनेकांना गजाआड जावे लागले तीच वेळ गोव्‍यातील या घोटाळ्यात सामील असलेल्‍यांवर येऊ शकते, असे एल्विस गोम्स म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com