MLA Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: मुरगावातील जेटी कोळशासाठीच! जिंदाल कंपनीकडून गोव्‍यात क्षमतेपेक्षा जास्‍त कोळशाची आयात; सरदेसाई बरसले

MLA Vijai Sardesai: गोव्यात जिथे जाईल तिथे कोळसाच दिसतो. राज्याला ‘कोल हब’ बनवले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात जिथे जाईल तिथे कोळसाच दिसतो. राज्याला ‘कोल हब’ बनवले जात आहे. जिंदाल कंपनीला 5.5 लाख टन कोळसा आणण्याची मुदत असताना त्या कंपनीने ९ लाख टन कोळसा आणला. यावरून मुरगावला क्रुझ टर्मिनससाठी जेटी बांधली जात नाही तर ती कोळसा वाहतुकीसाठी बांधली जात आहे हे स्‍पष्‍ट होते, असा आरोप विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला.

गेल्या पाच वर्षांत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकाही कारखान्‍यावर कारवाई केलेली नाही. कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीत प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. तेथे मोठ्या प्रमाणात धोकादायक कचरा अजूनही आहे. तो पिसुर्लेला हटविला जात नाही. रात्रीच्या संगीत पार्ट्यांवरील कारवाईसाठी लाईव्ह ऑनलाईन नियंत्रणाची गरज आहे, असे सरदेसाई म्‍हणाले.

मच्छीमार खाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेळसाव किनाऱ्यावरील मासळी तपासली जात नाही. मासळी मरून पडल्‍यावर कारवाई केली जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून तेथील विक्रेत्यांना १२ लाख ३७ हजार रुपयांचे शुल्क आकारले. परंतु मासळी चांगली आहे किंवा नाही, हे सांगणारी यंत्रणा तेथे नाही, याकडे सरदेसाई यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT