Assembly Election 2022 Mamata Banerjee

 

Dainik Gomantak 

गोवा

‘ममतां’वर जातीयवादाचा ठपका!

लवूंचा तृणमूलला ‘रामराम’; मगोने 28 जागा विकल्‍याचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी Assembly Election 2022: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आयाराम गयाराम’ सत्र तेजीत आहे. गोव्याच्या समृद्ध विकासासाठी एकत्रित येत असल्याचा डांगोरा पिटत तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी पोलिस अधिकारी तथा माजी आमदार लवू मामलेदार यांनी तृणमूलवर टीकास्त्र सोडत शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. तृणमूलमधून बाहेर पडणारे ते राज्यातील पहिले नेते ठरले आहेत.

तृणमूल (TMC) जातीयवादी राजकारण करीत असून मगोपबरोबर केलेली युती त्याचाच भाग असल्याचे सांगत मगो पक्षाने पैशांच्या लालसेपोटी 28 जागा तृणमूलला विकल्या असून त्याचे पैसे मगो (MG) नेत्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा गंभीर आरोप मामलेदार यांनी केला आहे. आज लवूमामलेदार यांच्‍यासह सुजय मळीक, किशोर परवार, कोमल परवार, राम मामलेदार यांनीही राजीनामे दिले. काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणत तृणमूल काँग्रेसने मोठा गाजावाजा करत गोव्यात प्रवेश केला. सुरवातीलाच काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) आणि अन्य सात जणांचे कोलकात्यात आणि नंतर पणजीमध्ये प्रवेश सोहळे रंगले. यामध्ये मगोचे माजी आमदार लवू मामलेदार आघाडीवर होते. मात्र, अवघ्या तीन महिन्यांमध्येच मामलेदार यांनी तृणमूलला रामराम ठोकला. यावेळी त्यांनी केलेले आरोप मात्र खूपच गंभीर स्वरूपाचे आहेत.

पैसे देऊन मगोकडून उमेदवार घेतले

सत्ता आणि पैशांसाठी आसुसलेल्या मगो पक्षाने 28 ते 31 जागा तृणमूल काँग्रेसला विकल्‍या आहेत. त्यांचे पैसे मगो पक्षाच्या नेत्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तृणमूल आणि मगो युतीमुळे मगो पक्षावर झालेली बोचरी टीका लक्षात घेता, ही युती तुटेल आणि मगो हा काँग्रेस किंवा भाजपबरोबर (BJP) जाईल अशी चर्चा होती. मात्र, नैतिकता नसलेल्या नेत्यांना त्याचे काहीच पडले नाही, असा आरोपही मामलेदार यांनी केला.

तृणमूल काँग्रेसमध्ये हायकमांड असणार नाही, असे सांगितले तरी सर्वच निर्णय वरच्या पातळीवर होतात. सत्ता आणि पैशांसाठी आसुसलेल्या, नैतिकता नसलेल्या मगो पक्षाबरोबर तृणमूलने युती केली आहे. हिंदूंसाठी मगो आणि ख्रिश्चनांसाठी तृणमूल अशा उमेदवारांची विभागणी केली जाते, हे कोणत्या तत्त्वाला धरून आहे, हे समजत नाही. म्हणूनच मी राजीनामा देत आहे.

- लवू मामलेदार, माजी आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT