नेसाय येथे दारूच्या कारखान्याला आग लागून कोट्यवधींची हानी

आग विझविण्यासाठी अनेक पाण्याच्या बंबाचा वापर करण्यात आला पण रात्री उशिरापर्यंत ती आग आटोक्यात आली नाही
A fire at distillery in Nesai has cost billions

A fire at distillery in Nesai has cost billions

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव: नेसाय औद्योगिक वासहतीतील नवीन डिस्टीलरी या दारूच्या कारखान्याला आग लागून कोट्यवधीची हानी झाली असून रात्री उशिरापर्यंत हे आग (Fire) विझविण्याचे काम चालू होते. ही आग विझविण्यासाठी मडगाव (Margao), कुडचडे, वेर्णा, वास्को (Vasco) व काणकोण येथून आग विझविण्याचे बंब आणले होते.

<div class="paragraphs"><p>A fire at distillery in Nesai has cost billions</p></div>
काँग्रेस लोकहितवादी निर्णय घेण्यास अपयशी ठरल्यानेच तृणमुलमध्ये प्रवेश

या कारखान्यात अल्कोहोल (Alcohol) साठवून ठेवण्याच्या पाच टाक्या होत्या. या प्रत्येक टाकीची क्षमता 80 हजार लिटर एव्हढी होती. यातील एका टाकीला गळती लागल्याने ही आग (Fire) भडकली असावी असे सांगण्यात येत आहे. ही आग लागण्याची घटना रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. कारखान्याला आग लागल्याचे लक्षात आल्यावर लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र पाचही टाक्यांनी पेट घेतल्याने स्थिती हाताबाहेर गेली. आग विझविण्यासाठी अनेक पाण्याच्या बंबाचा वापर करण्यात आला पण रात्री उशिरापर्यंत ती आग आटोक्यात आली नव्हती.

<div class="paragraphs"><p>A fire at distillery in Nesai has cost billions</p></div>
काँग्रेस लोकहितवादी निर्णय घेण्यास अपयशी ठरल्यानेच तृणमुलमध्ये प्रवेश

हा कारखाना या औद्योगिक वसाहतीतील सर्वात जुना कारखाना असल्याची माहिती मिळाली आहे. ही आग कशी लागली याचे कारण शोधण्याच प्रयत्न चालू आहे असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com