New Guidelines: गोव्यात ध्वनिक्षेपकावर रात्री 10 नंतर निर्बंध

पोलिस महासंचालकांनी गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशांची पूर्तता करण्यासाठी पोलिस गस्त नेहमीपेक्षा वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.
Restrictions on loudspeakers in Goa after 10 pm

Restrictions on loudspeakers in Goa after 10 pm

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी: नववर्ष (New Year) स्वागतासाठी गोव्यात सध्या मोठ्या प्रमाणात धामधूम सुरू आहे. नववर्षाच्या पूर्वरात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करत संगीत रजनी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री 10 वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक वापरावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बंदी घातली आहे. या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे व उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी गस्त घालण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलिस महासंचालकांनी गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशांची पूर्तता करण्यासाठी पोलिस गस्त नेहमीपेक्षा वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्याच्या किनारपट्टी (Goa Beach) भागात संगीत रजनी पार्ट्या पहाटेपर्यंत सुरू असतात.

याविषयी तक्रारी करूनही सरकारी (Goa Government) यंत्रणा कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याची जनहित याचिका सागरदीप शिरसईकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी लारिव्ह बीच शॅकचा उल्लेख केला होता. या शॅकमध्ये पहाटेपर्यंत कर्कश आवाजात संगीत पार्ट्या सुरू असल्याचा दावा केला होता. न्यायालयाने (Goa court) या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्यातील सर्वच ठिकाणी अशा प्रकाराविरुद्ध जिल्हाधिकारी तसेच पोलिस यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

काय आहेत न्यायालयाचे निर्देश?

  • रात्री 10 वाजल्यानंतर सुरू असलेल्या संगीत पार्ट्यांप्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलिसांचा टोल फ्री क्रमांक112 हा सर्व ठिकाणी प्रसिद्ध करावा.

  • या क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींची वेगळी नोंद करून ठेवून ती संबंधित पोलिस स्थानकाकडे वर्ग करावी.

  • तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी त्वरित उपकरणांसह त्या ठिकाणी उपस्थित राहून शहानिशा करावी व गरज भासल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.

  • ध्वनिक्षेपकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी दिली जात असल्याने त्यासंबंधीच्या तक्रारी या कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी वर्ग कराव्यात.

  • पोलिसांनी छापे टाकून संगीत पार्ट्यांच्या परवान्यांची तपासणी करावी.

  • या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच जनतेला त्याचा त्रास होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणेने भरारी पथकेही तयार ठेवावीत.

<div class="paragraphs"><p>Restrictions on loudspeakers in Goa after 10 pm</p></div>
नेसाय येथे दारूच्या कारखान्याला आग लागून कोट्यवधींची हानी

ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने सूचना आणि आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोमवारी कोरोनाशी संबंधित तज्ज्ञ समितीची बैठक होईल. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार काही बदल करण्यात येतील. तर बुधवारी कृती दलाची बैठक होईल आणि बैठकीत ठरल्यानुसार पुढील आदेशांची अंमलबजावणी  करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com