Assagao Demolition Dainik Gomantak
गोवा

Assagao Demolition Case: पूजा शर्माने आगरवाडेकर कुटुंबीयांवर दाखविली दया; पोर्तुगीज कायद्याचा हवाला

Pooja Sharma: मालमत्तेत अतिक्रमण करणाऱ्याला स्वतः किंवा न्यायालयाच्या माध्यमातून हद्दपार करण्याचा अधिकार आहे असा युक्तिवाद वकिलांनी गोवा खंडपीठात केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथे प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याचा बेकायदेशीर प्रयत्न झाल्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आता ही मालमत्ता विकत घेणारी पूजा शर्मा हिला पोर्तुगीज नागरी संहितेच्या कलम ४८६ नुसार मालमत्तेत अतिक्रमण करणाऱ्याला स्वतः किंवा न्यायालयाच्या माध्यमातून हद्दपार करण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात केला आहे.

तिने तसे न करता पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे तक्रार केली होती, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

मालमत्ता विकत घेताना अमूक यांची मुलगी असा उल्लेख करणाऱ्या पूजा हिने न्यायालयाने पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिल्यावर मात्र आपण भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले आहे.

...याचा पूजाला लाभ

आगरवाडेकर यांच्या पत्नीने तक्रारीत पूजा यांचे नाव घेतले असले, तरी त्यांची घर पाडण्याच्या प्रकरणात नेमकी भूमिका काय, हे स्पष्ट केले नव्हते. ‘एफआयआर’मध्येही पूजा यांचे नाव नोंदविले नाही. घर पाडले त्यावेळी २२ जून रोजी त्या गोव्यात आल्या नव्हत्या, असेही त्यांच्या वकिलाने न्यायालयात नमूद केले.

गोव्याबाहेरून येऊन कोणीही पोर्तुगीज नागरी संहितेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. ही तरतूद गोमंतकीयांसाठीच आहे. तिचा गैरवापर गोमंतकीयांना मालमत्तेतून बेदखल करण्यासाठी केला जाऊ नये.
ॲड. आल्बर्टिना आल्मेदा, समाज कार्यकर्त्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

SCROLL FOR NEXT