Water tanker  Dainik Gomantak
गोवा

Water Scarety : आसगाव, हणजूण परिसरात पाणीटंचाई; टँकरवाले मालामाल

Water Scarety : लोक हतबल : प्रति टँकर दर ७०० ते १,५०० रुपये

गोमन्तक डिजिटल टीम

Water Scarety :

म्हापसा, आसगाव व हणजूण या किनारपट्टीच्या गावांमध्ये सार्वज नियमित पाणीपुरवठ्याच्या टंचाईमुळे पाण्याच्या टँकर व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.

परिणामी, लोकप्रतिनिधी व त्यांचे नातेवाइकांचा या महत्त्वाच्या स्रोतांतून नफा कमावण्याचा सहभाग वाढला आहे.

दरम्यान, खासगी पाण्याच्या टँकरचे दर ७०० रुपयांपासून दीड हजार रुपये व पिण्याचा पाण्याचा टँकरचे दर वेगळे अशा पद्धतीने पाणी विकण्यात येत असून त्यावर कुणाचेच नियंत्रण दिसून येत नाही. एकप्रकारे टँकर व्यावसायिकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.

सध्या हणजूण, आसगाव भागात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून याचा काही लोकप्रतिनिधींनी पाण्याच्या नितांत गरजेचा गैरफायदा घेत पाण्याच्या टँकरच्या किफायतशीर व्यापारात प्रवेश केला आहे, असे समजते. हे लोकप्रतिनिधी त्यांच्या नातेवाइकांसह स्थानिक रहिवाशांनाच नव्हे, तर हॉटेल व इतर व्यावसायिक आस्थापनांनाही पाणी पुरवतात, असे समोर आले आहे.

आसगाव येथील रहिवासी, एर्विन फोन्सेको यांनी यात पंचायत सदस्यांचा सहभाग हे उघड गुपित आहे याकडे लक्ष वेधले. गावातील प्रत्येकाला याची माहिती आहे की पंचायत सदस्य कोण आहेत, जे पाण्याच्या टँकरचा व्यवसाय करतात आणि ते किती टँकर चालवतात, असेही फोन्सेको म्हणाले.

तसेच हणजूणमध्ये पंचायत सदस्यांची टँकरची थेट मालकी कमी असली तरी त्यांचे नातेवाईक पाण्याच्या टँकर व्यवसायात आहेत.

विहिरी, बोअरवेललमधून पाणी उपसा

१ पाण्याच्या टँकरचा प्रसार चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. ज्यामुळे वाहतूक प्रवाहात व्यत्यय येतो. ऑपरेटर खासगी विहिरी आणि बोअरवेलचे बिनदिक्कतपणे पाणी उपसा करत असल्याने भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत आहे.

२बांधकाम व हॉटेल प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक सोईस्कर उपाय म्हणून याची सुरवात झाली होती. आज हा धंदा बनला असून याचे स्थानिक लोकांवर विपरीत परिणाम झालेत.

३ हे टँकर चालक, वेळ व एकमेकांमध्ये स्पर्धा करीत अरुंद रस्त्यांवरून अत्यंत वेगाने मार्गक्रमण करतात. ज्यामुळे इतर वाहनचालकांना जीव मुठीत धरुन वाहने हाकावी लागतात.

४टँकरचा प्रसार चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे, दर पाच मिनिटांनी एक टँकर येथील रस्त्यावर धावताना दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

Goa Today Live News: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT