Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

RGP Manoj Parab: गोमन्तकीयांनी फक्त तडजोडीचे राजकारण पाहिले आहे. पण, आरजी अशा राजकारणाला बळी पडणार नाही
Revolutionary Goans | Manoj Parab
Revolutionary Goans | Manoj ParabDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics

गोव्यात 'धर्म खतरे मे है' म्हणत राजकीय पक्षांनी मते मागितली असा आरोप रिव्हॉल्युशरी गोवन पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर गोवा उमेदवार मनोज परब यांनी केला. तसेच, आरजीचा जन्म माघार घेण्यासाठी झाला नाही, असेही त्यांनी तडजोडीच्या राजकारणावर बोलताना मत मांडले.

लोकसभा निवडणुकीतून माघार यासाठी अनेकांनी संपर्क साधल होता. पण, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म झालेला नाही. गोमन्तकीयांनी फक्त तडजोडीचे राजकारण पाहिले आहे. पण, आरजी अशा राजकारणाला बळी पडणार नाही, असा खुलासा परब यांनी पत्रकार परिषदेत केला.

गोव्यात निवडणुकीचा ट्रेन्ड बदलला आहे. धर्माच्या आधारावर राज्यात प्रचार केला जात असल्याचा आरोप परब यांनी केला. राजकीय पक्ष धर्म खतरे में है म्हणत मते मागत आहेत. लोकशाही आणि संविधान मागे पडत असल्याचे परब यावेळी म्हणाले.

Revolutionary Goans | Manoj Parab
Margao: मडगाव पोलिस स्टेशन समोरच स्वत:ला भोकसले, परप्रांतीय व्यक्ती गंभीर जखमी

दरम्यान, आरजीने पहिल्यांदाच लोकसभा लढवत असून उत्तरेत त्यांनी पक्षाध्यक्ष मनोज परब आणि दक्षिणेत रुबर्ट परेरा यांना उमेदवारी दिली होती. आरजी निवडणुकीत बाजी मारणार नसले तरी मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या मतांना मोठ्या प्रमाणावर प्रभावित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात यावेळी विक्री ७६.६० टक्के मतदान झाले असून, वाढलेल्या मतदानाचा टक्का भाजपला फायदेशीर ठरणार असे बोलले जात आहे. मात्र, याबाबतचे चित्र चार जून रोजीच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com