गेल्या वर्षभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल फोंडा आरटीओने डिसेंबर 2022 पर्यंत दंडाद्वारे 1.90 कोटी रुपये वसूल केल्याची माहिती दिलीय. मुरगाव तालुक्यातही वाहतूक सुरळीत व्हावी, अपघातांवर नियंत्रण यावे आणि वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वास्को वाहतूक खात्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर व त्यांच्या वाहतूक पोलीस सहकाऱ्यांनी आपल्या परीने उपाययोजना आखून वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांकडून 1 जानेवारी ते 31डि सेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीत एकूण 32246 गुन्ह्यांची नोंद करून एकूण 15294200 रुपये दंडापोटी सरकारी तिजोरीत जमा केले.
वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने मुरगाव तालुक्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वाहने हाकणे, एकेरी व बंद रस्ता, वाहन परवाना नाही, आयुर्विमा नाही, गणवेश न घालणे, प्रदूषण दाखला नसणे आदी प्रकरणी वर्षभरात भरीव दंड ठोठावून वाहन चालकांना धारेवर धरलेय.
यामध्ये जलदगतीने-
वाहन चालवणाऱ्या 456 चालकांकडून 4 लाख 56 हजार रुपये वसूल केले.
निष्काळजीपणाने वाहन चालवलेल्या 607 वाहन चालकांकडून 6 लाख 40 हजार रुपये वसूल केले.
दारु पिऊन गाडी चालविणे 106 जणांवर कारवाई करण्यात आलीय.
धोकादायकपणे वाहन उभे केलेल्या 5244 जणांकडन 19 लाख 76 हजार रुपये वसूल केले.
हेल्मेट न घालता वाहन चालविणे 7857 जणांकडून 34 लाख 59 हजार 500 रु. दंड जमा केले.
वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या 265 जणांकडून 9 लाख 42 हजार रु. दंड जमा केला.
बेकायदेशीरपणे रस्ता ओलांडणाऱ्या 843 जणांकडून 3 लाख 90 हजार 900 रु., योग्यप्रकारे लाईट नसताना वाहन चालवणे 149 जणांकडून 59 हजार 500 रु. गोळा केले.
प्रखर झोतात वाहन चालविणाऱ्या 69 जणांकडून 2 लाख 70 हजार 500 रु. दंडापोटी जमा केले.
विना परवाना 280 वाहन चालकांकडून 6 लाख 89 हजार रु. दंड वसूल केला.
केबिनमध्ये प्रवाशांना बसविणाऱ्या 891 वाहन चालकांकडून 3 लाख 36 हजार 500 रु. दंड वसुल केला.
वाहनांवर अधिक प्रवासी नेणाऱ्या 467 वाहनचालकांकडून 1 लाख 88 हजार रु. दंडापोटी जमा केले.
माल वाहून नेणा-या वाहनात प्रवाशी बसविणाऱ्या 213 जणांकडून 82 हजार 100 रु. वसूल केले,
चारचाकी वाहन चालवताना सिट बेल्ट न घालणाऱ्या 2186 वाहन चालकांकडून 7 लाख 60 हजार 700 रु. वसूल करण्यात आले,
वाहनांच्या ग्लासला फिल्मिंग असलेल्या 2173 वाहन चालकांकडून 7 लाख 32 हजार 700 रु.,
नो पार्किंगच्या जागी वाहने उभी करून ठेवलेल्या 425 जणांकडून 62 हजार 600 रु. दंड रुपाने वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे
प्रवेश निषेध (नो एंट्री) मधून प्रवेश करणाऱ्या 3340 वाहनचालकांकडून 13 लाख 06 हजार 400 रु. भरपाई वसूल केली,
साईड लाइट न लावता वाहन चालविणाऱ्या 47 वाहनचालकांकडून 12 हजार 800 रु. वसूल करण्यात आले.
30 अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 56 हजार 100 रु. वसूल करण्यात आले.
बसस्थानक नसताना बस थांबवून प्रवाशी घेणाऱ्या 10 बसचालकांवर कारवाई करून 4000 रु.दंड वसूल केला.
वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या 47 वाहन चालकांकडून 7 हजार 600 रु दंडापोटी वसल करण्यात आले.
वाहतूक परवाना सोबत न ठेवणे अशा 231 वाहन चालकांकडून 1 लाख 41 हजार 950 रु. दंडापोटी वसूल करण्यात आले,
तसेच बसचा दरवाजा उघडा ठेवणे, अशा 110 वाहनांवर कारवाई करताना 40000 रु. गोळा करण्यात आले.
इन्शुरन्स संपलेल्या 16 वाहन चालकांकडून 21650 रु. दंड,
प्रदूषण परवाना नसताना वाहन चालवणाऱ्या 107 जणांकडून 52 हजार 500 रुपये दंड वसुल केला,
चुकीच्या जागी पार्किंग करणाऱ्या 160 वाहन चालकांना 69 हजार 600 रु. दंड थोपटण्यात आला,
एल् प्लेट लावलेली नसताना वाहन चालविणाऱ्या 15 जणांकडून 7200 रु. दंड वसूल केला.
नंबर. प्लेट नसताना वाहन चालविणाऱ्या 657 जणांकडून 2 लाख 30 हजार रु.दंडापोटी वसूल करण्यात आले,
कायदेशीर नंबर प्लेट नसलेल्या 2116 वाहन चालकांकडून 4 लाख 38 हजार 400 रुपये दंड वसूल केला, साईड आरसा नसताना चालविणाऱ्या 1469 जणांकडून 5 लाख 44 हजार 400 रुपये दंड ठोठावण्यात आला.
इतरांकडून इतर वाहतूक नियम धाब्यावर बसवलेल्या 873 वाहन चालकांकडून 3 लाख 53 हजार 300 रुपये दंडापोटी जमा केले,
झेब्रा क्रॉसिंगवर वाहन पार्किंग करणाऱ्या 282 वाहन चालकांकडून 1 लाख 32 हजार रुपये दंड वसुल केला.
वाहनाची कागदपत्रे बरोबर न बाळगता गाडी चालवणाऱ्या 12 वाहन चालकांकडून 5000 रु.दंड वसूल केला.
वायपर नसताना गाडी चालवणाऱ्या 27 वाहन चालकांकडून 12500 रुपये दंड वसूल केला.
अधिक प्रमाणात माल भरून वाहतूक करणाऱ्या 64 वाहन चालकांकडून 21 हजार 950 रुपये दंडापाई वसूल केले.
आदेशाचे पालन न करणाऱ्या 26 वाहन चालकांकडून 78550 रुपये दंड वसूल करण्यात आला.
लेन कटिंग करून वाहन चालवणाऱ्या 54 वाहन चालकाकडून 22000 रुपये दंड वसूल करण्यात आला.
लाल सिग्नल तोडून नियम मोडणाऱ्या 36 वाहन चालकांकडून 16 हजार 900 रुपये दंड वसुल करण्यात आला.
टॅक्सी मिटर न बसवलेल्या 03 टॅक्सीचालकांवर कारवाई करून 300 रुपये दंड वसुल करण्यात आला.
अश्या प्रकारे एकूण 32246 वाहन चालकांकडून 1 कोटी 52 लाख 94 हजार 200 रुपये दंडापोटी वसूल करुन सरकारी तिजोरीत जमा केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.