Goa Climate Change: गोव्यातल्या झाडांना अवेळीच येतो बहर; 'डूम्स डे' अभी दूर नहीं..!

जागतिक तापमानवाढीचे परिणाम; पर्यावरण संवर्धनासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे
Goa Climate Change
Goa Climate ChangeDainik Gomantak
Published on
Updated on

- आसावरी कुलकर्णी

Goa Climate Change: काही वर्षा पूर्वी 'डूम्स डे' नावाचा एक हॉलिवूडपट बघितल्याचे आठवते. खरं तर 2012 मध्ये जगबुडी होणार अशी वदंता होती, त्यामुळे हॉलिवूडमध्ये अशा आशयाचे अनेक चित्रपट निघाले होते. बऱ्याच ठिकाणी याची खिल्लीही उडविण्यात आली होती. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे निसर्गात होत असलेले बदल. गेल्या दोन ते तीन वर्षात अनेक नैसर्गिक बदल होताना दिसत आहेत, म्हणजे तसे ते पूर्वी होतच होते, पण आता ठळकपणे जाणवायला लागले आहेत. ऋतुचक्राची गती उलटीपुलटी झाली आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, वादळे अशा नैसर्गिक आपत्तीने जगाला घेरलं आहे. आणि आपण मात्र गुंग आहोत विकासाची दिवा स्वप्ने पाहात. अवतीभवती निसर्गात घडत असलेले बदल आपल्या नजरेसमोर आहेत, पण आपल्या लक्षात येत नाहीयेत. सजगता, संवेदनशीलता हरवलीय आणि आपण आभासी जगात राहतो आहोत.

Goa Climate Change
Bodageshwar Jatra: बोडगिणीत वसणारा बोडगेश्वर

काय आहेत संकेत?

गेल्या चार वर्षात ऋतू बदलाचे चढते उतरते आलेख आपण पाहत आलो आहोत. अचानक पडणारा पाऊस, गायब झालेली थंडी, वाढलेली उष्णता... या हवामानाच्या चढउताराला आपण सामोरे जात आहोत. 2021 ते 2022 या वर्षी जवळजवळ सगळ्याच महिन्यात आपण पाऊस अनुभवला. या ओल्या दुष्काळामुळे माणसावरच नाही इतर नैसर्गिक घटकावरही विपरीत परिणाम झालेला दिसतो. शेतीसाठी तर हे बदल कंबरडं मोडणारे ठरताहेत.

झाडे अवेळी फुलत आहेत...

बदलत जाणाऱ्या हवामानाचा परिणाम झाडांच्या जीवनचक्रावर झालेला आपल्याला ठळकपणे जाणवतो. या सगळ्या लेखन प्रपंचाचे कारण म्हणजे मौसमाआधी फुलणारी काही झाडं. गोव्याची गजबजलेली राजधानी पणजी येथे बरीच हिरवळ अजूनही शिल्लक आहे. काही जुने वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा आजही शाबूत आहेत. अशाच वृक्षांमध्ये पणजीच्या बसस्थानकात एक जांभळीचे झाड आहे. प्रसिद्ध हनुमानाच्या देवळाच्या कडेला हा वृक्ष आहे. या जांभळीच्या झाडाला गेल्या चार वर्षांमध्ये डिसेंबर महिन्यातच फुले येऊ लागली आहेत.

जांभूळ हे आरोग्यदायी असे फळ आहे, आणि त्याचा मौसम ग्रीष्म ऋतु हा आहे. पण गेल्या चार वर्षात डिसेंबर महिन्यापासून यावर फुलोरा येतो आणि मार्चपर्यंत त्यावर फळधारणाही होते. अर्थात अवेळी आल्यामुळे फळांची गुणवत्ता खास नसते. अर्थात कलमी झाडांना वर्षांचे बाराही महिने फळं लागू शकतात एवढी प्रगती आपण केलेली आहे. पण हे झाड रानटीच आहे, नैसर्गिकरित्या उगवलेले आहे. त्यामुळे त्यावर येणार फुलोरा अनैसर्गिक आहे.

Goa Climate Change
Mhadei Water Dispute: गोव्याचं पाणी कर्नाटक पळवणार? 'म्हादई' वरील प्रकल्पाच्या DPR ला केंद्राची मंजुरी

गुलमोहोर, बहावा वृक्ष ज्याला एप्रिल ते मे महिन्यात फुल येतात, तेही नोव्हेंबर-डिसेम्बर महिन्यातच फुलायला लागली आहेत. सप्तपर्णीचे झाड चौथ्यांदा फुलते आहे. एखादे चुकार झाड अवेळी फुलले की त्याला Stray Flowering असं शास्त्रीय नाव आहे. पण गोव्यातल्या कितीतरी ठिकाणी ही झाडं यावेळी फुलत आहेत.

प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. जनार्दनम म्हणाले की, या विषयावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. कोल्हापूर येथील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले की, जागतिक तापमानवाढीचे हे संकेत आहेत. झाडांच्याच नव्हे तर पक्षी आणि प्राण्यांच्या स्वभावामध्ये बदल झालेला दिसतो. कोकिळा भर पावसात ओरडते. स्थलांतरित पक्षी ठरलेल्या ठिकाणी येत नाहीत. हे सगळे संकेत जगाच्या आणि पर्यायाने आपल्या विनाशाचेच पडघम आहेत. अजूनही तशी वेळ गेलेली नाही. आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेळीच पावले उचलणे महत्वाचे आहे. रस्ते, धरण, खाणी यामुळे होणाऱ्या परिणामांना आता सुरुवात झाली आहे. योग्य काळजी घेतली नाही तर 'डूम्स डे' अभी दूर नाही...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com