Mormugao Municipality
Mormugao Municipality  Dainik gomantak
गोवा

...त्यामुळे मुरगाव पालिकेला मोठ्याप्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागणार

दैनिक गोमन्तक

मुरगाव नगरपालिका राज्यात ' अ ' दर्जाची पालिका असल्याने येथील जनतेकडून मोठ्या प्रमाणात विकास कामाची अपेक्षा होती. मात्र गेल्या पंधरा वर्षापासून वास्को शहर विकासापासून वंचित राहिले आहे. यात लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक सपशेल अपयशी ठरले आहेत. तीस वर्षापासून वास्को वासियांना सुसज्ज असे मासळी मार्केट बांधून देण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. गेल्या वर्षी नवीन मासळी मार्केट बांधण्याची प्रक्रिया सुरू केली होती, पण वास्को मासळी मार्केटवासियाकडून व प्रशासनामध्ये योग्य रित्या समझोता नसल्याने मासळी व्यवसायिकांना तात्पुरती बांधलेले मासळी मार्केट (Fish Market) पांढरा हत्ती व बेवारश्यांचे माहेरघर बनले आहे. यामुळे पुन्हा एकदा वास्को वासीय मासळी मार्केट पासून वंचित राहिले आहे.

वास्को शहरा जवळ बंदर असल्याने येथील मुरगाव नगरपालिकेकडून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात जकात कर मिळतो. पण याचा मुरगाव, वास्को व काही प्रमाणात दाबोळी मतदार संघाला अजिबात फायदा होत नाही. गोव्यात मुरगाव नगरपालिका ' अ' दर्जाची असून सुद्धा मुरगाव, (Mormugao) वास्कोवासीय विकासापासून वंचित राहिले आहे. याला पूर्णपणे जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर मुरगाव नगरपालिका प्रशासन आहे. त्यामुळे वास्कोत शहरात गेल्या पंधरा वर्षांपासून काही सरकारी प्रकल्प उभे राहिले नाही.

एखाद्या प्रकल्पाची पायाभरणी समारंभ होते, मात्र त्या प्रकल्पाचे पुढील काम टक्केवारीमुळे पूर्णत्वाकडे जात नाही. यातच सर्वप्रथम वास्को शहरातील जून्या बस स्थानका बाजूस असलेले मासळी मार्केट. दोन वेळा पायाभरणी होऊन सुद्धा काम सुरू होत नाही. गेल्या वर्षी मुरगाव नगरपालिका व राज्य नगर विकास संस्था (सुडा) तर्फे मासळी मार्केट बांधण्याची सर्व प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. पण वास्को मासळी व्यवसायिक व प्रशासनामध्ये योग्यरीत्या समझोता न झाल्याने काम पुन्हा एकदा लांबणीवर पडले.

मुरगाव नगरपालिकेने राज्य महसूल विभागाच्या ताब्यात असलेली देव दामोदर ट्रस्टची जागा पाच लाख रुपये वर्ष पद्धतीप्रमाणे भाडे तत्वावर घेतली आहे. तेथे तात्पुरती सर्व सुविधा उपलब्ध करून मासळी मार्केट उभारलेले असताना सुद्धा वास्को मासळी मार्केट व्यावसायिक व्यवसाय करण्यास तयार नाही. ( सुडा) तर्फे बांधण्यात आलेले तात्पुरती मार्केट पूर्ण सुविधांनी तयार झालेले आहे. मासळी घेण्यासाठी येणाऱ्यांना पार्किंग व्यवस्था, महिला पुरुषांसाठी वेगळे सौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय अशी विविध कामे येथे केलेली आहे. मात्र व्यावसायिक येथे व्यवसाय करण्यास अजिबात रस दाखवत नाही.

मुरगाव नगरपालिका प्रशासनातर्फे तात्पुरती मासळी मार्केटचा खर्च अंदाजे 55 लाख असे समजते. राज्य नगर विकास संस्था ( सुडा) वास्को देव दामोदर ट्रस्टच्या जागेत बांधलेल्या तात्पुरती मार्केटचा उपयोग जर स्थानिक मासळी व्यवसायिक करीत नाही, तर तेथे शहरातील सर्व फळ, भाजी विक्रेत्या बरोबर घाऊक मासळी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी संधी द्यावी. अन्यथा मुरगाव नगरपालिकेला दरवर्षी महसूल विभागाला पाच लाख रुपये भाडे द्यावे लागेल. यामुळे पालिकेला मोठ्याप्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी पालिकेने स्वतःचे नुकसान होण्यापूर्वी या जागेचा फायदा करून घेण्याचा विचार करावा.

तसेच नवीन मासळी मार्केट बांधण्यासाठी सुडाला दिलेले 23 कोटी रुपये पुन्हा मुरगाव पालिका तिजोरीत जमा करण्यासाठी सुडाला आदेश जारी करावा. अन्यथा मुरगाव पालिकेला दरवर्षी महसूल विभागाला पाच लाख रुपये भाडे द्यावे लागणार यासाठी पालिकेने नवीन मासळी मार्केट प्रकल्प दूर ठेवून पालिका कशाप्रकारे आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल याचा विचार करावा.

मुरगाव नगरपालिका इमारतीत गेल्या चाळीस वर्षापासून महसूल विभागातील मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालय येथूनच आपला कार्यभाग चालवत होते. गेल्या चाळीस वर्षाचे अंदाजे दोन्ही विभागाचे जवळ जवळ कोटी रुपये थकबाकी मुरगाव पालिकेला येणे असताना सुद्धा मुरगाव नगरपालिका देव दामोदर ट्रस्ट मधील तात्पुरती मासळी मार्केटला दरवर्षी पाच लाख रुपये महसूल विभागाला कोणत्या आधारे देतात, याचा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. यासाठी मुरगाव नगरपालिकेने गंभीर विचार करून पालिकेची थकबाकी वसूल करण्यासाठी उचित पाऊल उचलणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT