Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना 5 जानेवारीला म्हापसा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

ॲड. सुरेल तिळवे यांनी केजरीवालांची बाजू मांडली

Kavya Powar

Arvind Kejriwal in Mapusa Court: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना म्हापसा न्यायालयाने उद्या बुधवार २९ रोजी कोर्टात हजर राहण्यासंदर्भात समन्स जारी करण्यात आला होता. माहितीनुसार, केजरीवाल यांनी २०१७मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा समन्स बजावण्यात आला.

मात्र ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. म्हापसा न्यायालयाने त्यांना आज न्यायालयात हजर राहण्यास सूट दिली. यावेळी ॲड. सुरेल तिळवे यांनी केजरीवालांची बाजू मांडली मात्र न्यायालयातर्फे केजरीवाल यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर प्रकरण 5 जानेवारी 2024 पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

'या' कारणास्तव समन्स

उपलब्ध माहितीनुसार, २०१७मध्ये म्हापसा टॅक्सी स्टँडवर झालेल्या आपच्या प्रचार सभेवेळी केजरीवाल यांनी वादग्रस्त विधान केले होते. केजरीवाल म्हणाले होते की, सर्वांकडून पैसे घ्या मात्र मतदान आप पक्षाला मतदान करा असे ते त्यावेळी म्हणाले होते. या वक्तव्याची दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार हे प्रकरण न्यायालयात गेले आणि आता केजरीवाल यांना याप्रकरणी समन्स जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT