Goa News Update 29 November: वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

Goa Breaking News 29 November 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates 29 November 2023
Goa Live Updates 29 November 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट नाईट क्लब खंडणी प्रकरण, झासी येथील एकाला अटक

कळंगुट नाईट क्लब खंडणी प्रकरणी झासी येथील एकाला अटक करण्यात आली आहे.

शिरदोण सरकारी शाळेतून बेपत्ता झालेल्या मुली मिरामार येथून ताब्यात

पाळे शिरदोण येथील सरकारी शाळेतून बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुलींना आगशी पोलिसांनी मिरामार येथून ताब्यात घेतले आहे. दोन तासांच्या आत ही कामगिरी करण्यात आली.

मुख्यमंत्री सावंत गुरुवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर

म्हादई प्रकरणी गोव्यात मजबूत स्थितीत; मुख्यमंत्री सावंत

म्हादई केस प्रकरणात गोवा मजबूत असून, कर्नाटकने अद्याप एकही कागदपत्र सादर केले नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

बेकायदेशीर 31 घरांवर बुलडोझर! सांकवाळ कोमुनिदाद जागेतील बांधकामे पाडण्यास प्रारंभ

सांकवाळ कोमुनिदादच्या जमिनीत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या ३१ बेकायदेशीर बांधकामावर आज पासून बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यास सुरुवात करण्यात आली.

सकाळी ११ वाजता कारवाईस सुरुवात करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १० घरे जमीनदोस्त करण्यात आली. उर्वरीत घरांवर उद्या कारवाई सुरू राहणार आहे.

गोव्यात अलिशान गाड्या होणार स्वस्त; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय, वाचा सविस्तर

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

१) गोव्यातील मोटार वाहन करात सुधारणा करण्यात आली असून, हाय एंड वाहनांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महागड्या अलिशान गाड्या स्वस्त होणार आहेत.

२) राज्य सरकारच्या सेवेतील क वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. योजने नुसार उर्वरीत वर्षापैकी प्रत्येक वर्षामागे दोन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मातृत्व रजा देण्याचा सरकारने निर्णय घेतला असून, गर्भपात झाल्यासही मातृत्व रजा मिळणार आहे.

३) मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग कल्याण खाते निर्मितीची घोषणा केली असून, पुढील आर्थिक वर्षापासून दिव्यांग कल्याण खाते कार्यरत होणार आहे.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिव्यांगासाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्याबाबत वक्तव्य केले होते.

कुंडईत जमीन हडप प्रकरण उघडकीस तर, पर्वरीत एका संस्थेत 23 लाख रुपयांची अफरातफर

कुंडईत जमीन हडप प्रकरण उघडकीस आले असून, याप्रकरणी फोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पर्वरीत एका संस्थेत 23 लाख रुपयांची अफरातफर प्रकरणी अकाउंट विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडईत जमीन मालक आणि संबधितांची बनावट सही करुन जागा हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिल्डर आणि वकीलासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरी येथील मार्गावर कारचा भीषण अपघात

गिरी-म्हापसा मार्गावर कारचा भीषण अपघात. पर्वरीहून म्हापसाच्या दिशेने निघालेली अल्टो कार नारळाच्या झाडावर आदळली. यामध्ये वाहनचालक गंभीर जखमी.

शिळी, खराब भाजी आढल्यास आता दुकानावर होणार कारवाई

फलोत्पादन दुकानांबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी विभागातर्फे हेल्पलाईन क्रमांक जारी. कोणत्याही ग्राहकाला खराब आणि शिळी भाजी आढळल्यास ते फोटो क्लिक करून हेल्पलाइन क्रमांकावर पाठवू शकतात. गोवा फलोत्पादन विभागाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांची माहिती.

लाईनमन मृत्यू प्रकरणी एक निलंबित

शिवोली येथे वीजेचा धक्का बसून लाईनमनचा मृत्यू झाल्याप्रकरणी सहाय्यक लाईनमनला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी कनिष्ट अभियंत्याची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

झुआरीनगर कोमुनिदादमधील ६४ घरे पाडण्यास सुरवात

बिर्ला झुआरीनगर येथील कोमुनिदादच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या ६४ घरांचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. सांकवाळ कोमुनिदाद प्रशासनाकडून ही कारवाई सुरू आहे. या कारवाईला प्रशासनाने कोर्टातून परवानगी मिळवली आहे

केजरीवाल यांना 5 जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश

निवडणूक आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी म्हापसा JMFC न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज (29 नोव्हेंबर) न्यायालयात हजर राहण्यास सूट दिली. यावेळी ॲड. सुरेल तिळवे यांनी केजरीवालांची बाजू मांडली. न्यायालयातर्फे केजरीवाल यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश. प्रकरण 5 जानेवारी 2024 पर्यंत तहकूब.

बस्तोडातील तरुणाची मांडवी पुलावरून उडी

उसकई-बस्तोडा (म्हापसा) येथील 27 वर्षीय फारुख या तरुणाने काल (28 नोव्हेंबर) मध्यरात्री मांडवी पुलावरून उडी घेऊन संपवले जीवन. पर्वरी व पणजी पोलिसांकडून मृतदेहाचा शोध जारी. बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्तातून आत्महत्या केल्याचा कुटुबियांचा संशय.

फोर प्ले, क्लायमॅक्स आणि पॉर्न! 'इफ्फी'त हॉलीवूडस्टार मायकल डग्लसकडून अश्लील कॉमेंट्स...

फोर प्ले, क्लायमॅक्स आणि पॉर्न हे शब्द पाश्चिमात्य जगतात जितके सहज वापरले जातात तितके अद्याप भारतीय जनमानसात सार्वजनिकरित्या वापरले जात नाहीत.

तथापि, मंगळवारी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) च्या मंचावर हॉलीवूड स्टार मायकल डग्लस यांच्याकडून मात्र सार्वजनिक संवाद सत्रात अशा शब्दांचा सर्रास वापर झाला. या अश्लील कॉमेंट्समुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मायकल डग्लस यांना यंदाच्या इफ्फीमध्ये सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने मंगळवारी सायंकाळी समारोप सोहळ्यात गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com