Arpora Nightclub Dainik Gomantak
गोवा

Arpora Nightclub: 'बर्च क्लब'वर कोणाचा वरदहस्त? 'त्या' वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने पोलिसांना कारवाईपासून रोखल्याचा धक्कादायक खुलासा!

Senior IPS Officer Interference: गोवा पोलिसांच्या दोन युनिटने, वरील क्लब मालकाला त्यांच्या आस्थापनाकडे असलेल्या परवाने व कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हडफडे येथील बर्च बाय ‘रोमिओ लेन’ या क्लबमध्ये भीषण आगीच्या दुर्घटनेत, शनिवारी २५ जणांचा बळी गेला. ही दुर्घटना टळली असती, जर वरिष्ठ सेवानिवृत्त व विद्यमान आयपीएस अधिकाऱ्यांनी, स्थानिक गोवा पोलिसांना कारवाईपासून रोखले नसते तर, अशी माहिती समोर येत आहे. एका इंग्रजी दैनिकात यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे तो निवृत्त आयपीएस अधिकारी कोण, अशी उत्सुकता सर्वांना लागून आहे.

गोवा पोलिसांच्या (Goa Police) दोन युनिटने, वरील क्लब मालकाला त्यांच्या आस्थापनाकडे असलेल्या परवाने व कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली होती. मात्र, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने गोवा पोलिसांना संबंधित नोटिशीचा पाठपुरावा करण्यापासून रोखले.

या अधिकाऱ्यांनी ‘बर्च क्लब’विरोधात ध्वनी प्रदूषण संदर्भात असलेला गुन्हाही रद्द करण्यास सांगितले होते. गेल्या २०२४ लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालिन हणजूण पोलिस निरीक्षकांनी क्लब आस्थापनाकडून त्यांच्याकडे कोणती कागदपत्रे आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी तेव्हा पोलिसांना हे प्रकरण पुढे नेण्यास रोखले. त्यानंतर, क्राईम ब्रँचनेही क्लबमधील उल्लंघनासंदर्भात बर्च आस्थापनाकडून परवानगीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. तेव्हाही वरील निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने आडमुठे धोरण घेतले.

‘शोकॉज’बाबत आपण अनभिज्ञ!

हणजूण (Anjuna) पोलिस स्थानकात पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांना मंगळवारी माध्यमांनी प्रश्न केला की, हडफडे येथील क्लबवर कारवाईबाबत काही आयपीएस अधिकाऱ्यांनी आडमुठे धोरण घेतले. यावर शर्मा उत्तरल्या की, मला याविषयी व शोकॉज नोटीसबद्दल काहीच माहिती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT