ध्वनिरोधक फोम, चुकीचे डिझाईन, नियम उल्लंघन ठरले घातक; प्रशासनाच्या उदासीनपणाचा मोठा फटका; आपत्कालीन यंत्रणा कुचकामी

Goa Nightclub Fire: हडफडेतील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबला लागलेली भीषण आग ही केवळ अपघात नसून क्लबच्या चुकीच्या डिझाईन आणि नियमभंगाचे दुष्परिणाम असल्याचे स्पष्ट संकेत तज्ज्ञांकडून मिळत आहेत.
Goa Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडेतील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबला लागलेली भीषण आग ही केवळ अपघात नसून क्लबच्या चुकीच्या डिझाईन आणि नियमभंगाचे दुष्परिणाम असल्याचे स्पष्ट संकेत तज्ज्ञांकडून मिळत आहेत. ध्वनिरोधक म्हणून वापरला जाणारा फोम हा अत्यंत ज्वलनशील असल्याने आग काही क्षणांतच पसरली, असे आपत्कालीन सेवेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाईट क्लबमध्ये सुरक्षाविषयक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले जाते. प्रत्यक्षात बहुतांश क्लबमध्ये आगीचा धोका कायम असतोच. नाईट क्लब ही रचना आणि अंतर्गत साहित्यामुळे आग लागण्यास अत्यंत धोकादायक जागा मानली जाते. अशा नाईट क्लबमध्ये पायरोटेक्निक्सचा वापरही धोकादायक ठरतो.

Goa Nightclub Fire
Goa Politics: सरकारविरोधी मतदार वगळण्यासाठी 'एसआयआर'चा वापर, एल्विस गोम्स यांची टीका

वायू, उष्णता, प्रकाश, ध्वनी आणि धूर निर्माण करणाऱ्या पायरोटेक्निक पदार्थांमुळे आग लागण्याचा मोठा धोका निर्माण होतो आणि याचे गंभीर परिणाम यापूर्वी अनेकदा दिसून आले आहेत. योग्य आयसोलेशन नसणे किंवा छताची कमी उंची असणे हे पायरोटेक्निकचा वापर आणखी घातक बनवते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील नाईटक्लबवर गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कायदा, गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम नियमन कायदा २००८, नियमन २०१०, तसेच गोवा पंचायत राज कायदा १९९४ या कायद्यांद्वारे नियंत्रण ठेवले जाते. मात्र नियमांना बगल देणाऱ्यांची संख्या कमी नाही, हेही वास्तव आहे.

स्प्रिंकलर प्रणालीच्‍या अभावामुळे धोका वाढतो

स्वयंचलित स्प्रिंकलर सिस्टम आग नियंत्रणात अत्यंत प्रभावी असल्याचे अनुभवातून सिद्ध झाले असतानाही बहुतांश नाईट क्लब मालक खर्च टाळण्यासाठी ही सुविधा बसवत नाहीत. गोवा इमारत व विकास नियम (२००८-२०१०) नुसार अग्निशमन मार्ग, मोकळी हवा, प्रवेश-निर्गमन मार्ग अनिवार्य आहेत. तसेच १५ मीटरपेक्षा उंच इमारतीसाठी अग्निशमन एनओसी बंधनकारक आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

Goa Nightclub Fire
Goa Politics: मये मतदारसंघात कार्यकर्त्यांना धमक्या, 'गोवा फॉरवर्ड'चा आरोप; सत्ताधारी भाजपवर साधले शरसंधान

राज्यातील बहुतांश नाईट क्लब हे अग्निशमन विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय चालवले जातात. पायरोटेक्निक्सचा विनाअनुमती वापर हे आग लागण्याचे प्रमुख कारण ठरते. छताची कमी उंची, अयोग्य आयसोलेशन आणि बंदिस्त रचना हेसुद्धा धोका अधिक वाढवणारे घटक ठरतात. - नितीन रायकर, संचालक (अग्निशमन दल)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com