Arpora Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

'बर्च' क्लब अग्नितांडवाप्रकरणी 'ईडी' अ‍ॅक्शन मोडमध्ये! गोवा, दिल्लीतील 8-9 ठिकाणी छापेमारी, अवैध व्यवहारांचा पर्दाफाश होणार?

Arpora Nightclub Fire: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमध्ये झालेल्या भीषण अग्नितांडवानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आहेत.

Sameer Amunekar

पणजी: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) क्लबमध्ये झालेल्या भीषण अग्नितांडवानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आहेत. ६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या त्या दुर्दैवी आगीत २५ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, क्लबचे अवैध कामकाज आणि त्यातून झालेली आर्थिक अफरातफर (Money Laundering) या आरोपाखाली ईडीने गोवा आणि दिल्लीतील विविध ८ ते ९ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले.

समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने 'बर्च' क्लबच्या मालकांच्या निवासस्थानासह त्यांच्या व्यावसायिक कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. केवळ मालकच नव्हे, तर या क्लबच्या बेकायदेशीर बांधकामाला किंवा कामकाजाला पाठबळ देणाऱ्या संशयास्पद व्यक्तींवरही कारवाईचा बडा बडगा उगारला आहे. यामध्ये हडफडे येथील माजी सरपंचासह पंचायत सचिवाच्या घराचाही समावेश आहे.

हडफडे येथील हा क्लब नियमांचे उल्लंघन करून चालवला जात होता, असे तपासात समोर आले आहे. या क्लबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा पांढरा केला गेल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

आगीच्या घटनेनंतर या क्लबच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या होत्या. स्थानिक प्रशासनातील काही व्यक्तींच्या मदतीने हे बेकायदेशीर साम्राज्य उभे राहिले का? याचा तपास आता ईडी करत आहे.

दुर्घटनेचा सखोल तपास

६ डिसेंबर रोजी लागलेली ती आग केवळ अपघात होती की त्यामागे दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराचे जाळे होते, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात होता. आता ईडीने मनी लाँड्रिंगचा कोन तपासण्यास सुरुवात केल्यामुळे या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गोव्यावर निवडणूक निकालाचा परिणाम होणार?

Louis Berger Bribery Scam: लुईस बर्जर घोटाळा प्रकरणात कामत, चर्चिल यांना दिलासा; 'पीएमएलए'चा तो आदेश हायकोर्टाकडून रद्द

बंगालमध्ये सत्तापालट! 'मिनी इंडिया'ने का नाकारली दीदींची साथ? भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवाची 5 मोठी कारणं

IPL Breaking धोनीने घेतला मोठा निर्णय! दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी 'यलो आर्मी'ला मोठा झटका; चाहत्यांमध्ये नाराजी

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! विद्यार्थिनीवर अत्याचार करून खाजगी फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; शिक्षकाला 11 वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT