Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

Goa Board 10th Result Rules: इयत्ता दहावीसाठी मुख्‍य असलेल्‍या सहा विषयांपैकी दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना भरपाई योजनेद्वारे उत्तीर्ण होण्‍याची संधी गोवा बोर्डने उपलब्‍ध करून दिली आहे.
Goa Education
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इयत्ता दहावीसाठी मुख्‍य असलेल्‍या सहा विषयांपैकी दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना भरपाई योजनेद्वारे उत्तीर्ण होण्‍याची संधी गोवा बोर्डने उपलब्‍ध करून दिली आहे. परंतु, जे विद्यार्थी दोन विषयांत कमीतकमी दहा टक्‍के गुण मिळणे बंधनकारक असेल, असे गोवा बोर्डचे सचिव विद्यादत्त नाईक यांनी जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

यंदा इयत्ता दहावीला इंग्रजी, हिंदी, मराठी/कोकणी या भाषा विषयांसह समाजशास्त्र, विज्ञान व गणित असे एकूण ६ मुख्य विषय आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी/कोकणी समाजशास्त्र व गणिताची परीक्षा ८०, तर विज्ञान परीक्षा ७० गुणांची असते.

यापैकी दोन विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला व त्‍याला ८० गुणांच्‍या परीक्षेत आठ आणि विज्ञान परीक्षेत ७० पैकी सात मिळाल्‍यास त्‍याला उत्तीर्ण केले जाईल, असे परिपत्रकात म्‍हटले आहे. यापूर्वी दहावी उत्तीर्णतेसाठी ८० गुणांच्या परीक्षेत १७, तर ७० गुणांच्या परीक्षेत १५ गुण आवश्यक होते.

Goa Education
Goa Teachers Recruitment: गोव्यात NEP ची होणार प्रभावी अंमलबजावणी! शाळांमध्ये 1008 शिक्षक, 377 इन्स्ट्रक्टर्सची होणार भरती

परंतु, राज्‍यात एनईपीची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्‍यानुसार अभ्‍यासक्रमातही बदल करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे बोर्डने भरपाई योजना राबवत उत्तीर्ण होण्‍यासाठी गुणांची टक्‍केवारी दहा केली आहे.

Goa Education
Goa Education: इयत्ता पहिली संदर्भात महत्वाची बातमी! 6 वर्षांपुढील मुलांनाच मिळणार प्रवेश; चालू अधिवेशनात सादर करणार विधेयक

सरकारी शाळांतील इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतच्‍या विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट देण्‍यासंदर्भातील योजना शिक्षण खात्‍याने अधिसूचित केली असून, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी यासंदर्भातील अधिसूचनाही जारी केली आहे. विद्यार्थ्यांच्‍या पालकांच्‍या आधार संलग्‍न बँक खात्‍यात गणवेशाचे ६०० आणि रेनकोटसाठी ५०० असे एकूण १,१०० रुपये जमा करण्‍यात येणार असल्‍याचे अधिसूचनेत नमूद करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com