Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: ‘बर्च’ प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार! खंडपीठाचे स्पष्टीकरण; गोव्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे दिले संकेत

Arpora Nightclub Fire: नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कठोर भूमिका घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कठोर भूमिका घेतली. गोव्यातील बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारी यंत्रणा मोडीत काढावीच लागेल असे स्पष्ट बजावत, न्यायालय या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन गोव्याच्या हितासाठी कठोर निर्णय घेईल, असे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि बेकायदा कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत न्यायालयाने आज सोमवारी सुनावणीदरम्यान दिले. प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन न्यायालयाने पुढील सुनावणी उद्या १३ जानेवारी रोजी निश्चित केली आहे. महाअधिवक्ता देविदास पांगम यांनी सरकारची बाजू मांडताना स्पष्ट केले की, ‘बर्च’ ही वास्तू पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि ती पाडणेच आवश्यक आहे.

यापूर्वी पंचायत स्तरावर पाडकामाची नोटीस बजावण्यात आली होती; मात्र पंचायत संचालनालयाच्या अपिलीय प्राधिकाऱ्याने त्याला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती. या गंभीर बाबीची दखल घेत सरकारने संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. बेकायदा कृत्य करणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही, अशी ग्वाही देखील पांगम यांनी दिली.

ॲमिकस क्‍युरी भावुक; साखळी उघड व्‍हायला हवी: न्यायालयीन मित्र (ॲमिकस क्‍युरी) अ‍ॅड. रोहित ब्रास डिसा हे दुर्घटनेतील मानवी बाजू मांडताना न्यायालयात भावुक झाले. आगीत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला असून त्यांपैकी २० जण हे हातावर पोट असणारे गरीब कर्मचारी होते.

त्यांचे कुटुंब न्यायालयात येऊ शकत नाहीत, म्हणूनच त्यांची बाजू मांडण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे, असे त्यांनी नमूद केले. केवळ सरपंचावर जबाबदारी ढकलून चालणार नाही तर यात सामील सर्व घटकांना उघडे पाडणे आवश्यक असल्याचे आहे. ही जमीन ‘मिठागर’ असतानाही किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने ती मिठागर नसल्याचा अहवाल कसा दिला? यावरही त्‍यांनी प्रकाश टाकला.

बेकायदा आस्थापनांशी सरकारचे कोणतेही प्रेम किंवा हितसंबंध नाहीत, असे ठाम प्रतिपादन करत महाअधिवक्त्यांनी पुढील कारवाईसाठी किनारी भागातील पंचायती आणि संबंधित प्रतिवाद्यांची यादी न्यायालयात सादर करण्यास मंजुरी मागितली आहे. उद्या मंगळवारी सुनावणीदरम्यान ‘न्यायालयीन मित्रा’कडे (ॲमिकस क्‍युरी) ही यादी सादर केली जाईल. यामध्ये किनारी भागातील पंचायतींचा समावेश करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: "विरोधी आमदारांचे वर्तन बेशिस्त आणि अशोभनीय"- सभापती

‘बुलबुल’ चित्रपट महोत्सवासाठी मडगाव सज्ज! रवींद्र भवन सजले प्राण्यांच्या कलाकृतीने; दिग्दर्शक नागराज मंजुळेंची खास उपस्थिती

Siolim: शिवोली आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा! नागरिकांत तीव्र संताप; अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात

FDA Raid: नवीन वर्षात एफडीएचा धडाका! बोडगेश्वर जत्रोत्सवात 41 स्टॉल्सची तपासणी; कवळे-मुरगाव येथेही कारवाई

Goa Politics: खरी कुजबुज; मोदी रिबेलोंना भेट देणार?

SCROLL FOR NEXT