Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

Goa Arpora Nightclub Fire: बागा येथील कुप्रसिद्ध बर्च घटनेचा उल्लेख मी कसा टाळू शकेन, जिथे २५ पुरुष आणि महिला जिवंत जाळले.
Goa Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बागा येथील कुप्रसिद्ध बर्च घटनेचा उल्लेख मी कसा टाळू शकेन, जिथे २५ पुरुष आणि महिला जिवंत जाळले. आपण याला केवळ एक अपघात म्हणून सोडून द्यावे का? की ही कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण घसरण, ढासळलेली शासनव्यवस्था आणि वाढता भ्रष्टाचार आहे? बर्च शोकांतिकेची जबाबदारी घेऊन राजीनामा देण्यास कोणताही मंत्री तयार नाही. भाजपचा कोणताही आमदार यावर चर्चा करू इच्छित नाही, असे वास्तव आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव विधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या विनंतीनंतर, विधिकार दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सदस्यांनी बर्च नाईट क्लब आग दुर्घटनेतील पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिटाचे मौन पाळले.

Goa Nightclub Fire
Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

यावेळी गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, विधानमंडळ मंचचे सचिव मोहन आमशेकर, उपाध्यक्ष व्हिक्टर गोन्साल्विस, प्रमुख वक्ते पद्मश्री डॉ. जे. एम. व्यास आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Goa Nightclub Fire
Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

आलेमाव म्हणाले, भाजप सरकार अधिवेशनात बर्च शोकांतिकेवर चर्चेस तयार नाही. त्याऐवजी, सरकार एका राष्ट्रीय गीताच्या - वंदे मातरमच्या १५० व्या वर्षाच्या उत्सवावर चर्चा करून हा विषय दडपून टाकू इच्छिते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com