Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

Goa Arpora Nightclub Fire: ‘बर्च बाय रोमियो लेन''च्या मालकाचे कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत.
Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘बर्च बाय रोमियो लेन''च्या मालकाचे कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत. अगोदरच बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या या नाईट क्लबच्या मालकाने अग्निशामक दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) कधीही मिळविले नसले तरी बाजूच्या ‘मेझन्स लेक व्ह्यू रिसॉर्ट''ला दिलेल्या एनओसीचा कथित गैरवापर केल्याचा प्रकार एका दंडाधिकाऱ्याच्या समितीच्या चौकशीतून आले आहे.

चौकशी समितीचा अहवाल प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला असल्याने त्यातून ते उघड झाले आहे. याच मालमत्तेत असलेल्या ‘मेझन्स लेक व्ह्यू रिसॉर्ट''ला मिळालेल्या एनओसीचा वापर लुथरा बंधू ‘बर्च बाय रोमियो लेन''साठी करीत होते, असे स्पष्ट दिसते.

‘बर्च बाय रोमियो लेन''ला २००४ पासून आत्तापर्यंत कधीच अग्निशामक दलाची एनओसी मिळाली नाही, ती मिळाली ती ‘मेझन्स लेक व्ह्यू रिसॉर्ट''ला. याशिवया सध्या नव्याने दिलेला ना हरकत दाखला हा या रिसॉर्टच्या ५६ खोल्यांसाठी लागू होत आहे आणि तो दाखला हा खोसलाच्या नावे आहे.

Arpora Nightclub Fire
Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

या अहवालातून असे दिसत आहे की, १९९६ पासून हे त्या बांधकामाच्या ठिकाणी रेस्टॉरंट चालत होते आणि सगळे परवाने रिसॉर्टच्या नावे मिळत होते. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी या मालमत्तेची व्यवस्थितरित्या माहिती दिली नाही. अग्निशामक दल कोणतीही सुरक्षेची पाहणी न करता किंवा खोलवर अभ्यास न करता असेच ना हरकत दाखले देत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.

‘मेझन्स लेक व्ह्यू रिसॉर्ट'' ला जो ५०२१ या घर क्रमांक आहे, त्याच घर क्रमांकावर ग्रामपंचायतीने पाण्यात त्यावेळी सुरू असलेल्या ‘ब्ल्यू लेगॉन रेस्टॉरंटल''ला एनओसी दिली होती. ग्रामपंचायतीने ‘बर्च बाय रोमियो लेन''ला दिलेल्या व्यवसाय परवान्यावर ५०२१ हाच घर क्रमांक आहे. ही एनओसी बर्च लेनला नव्हेतर कंपनीला दिली होती.

या दंडाधिकारी समितीच्या अहवालानुसार अग्निशामक दलाच्या दोन ‘क’ वर्गातील दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा सर्व प्रकार घडण्यास दोनच अधिकारी कारणीभूत आहेत का, त्यांना तोंडी आदेश दिल्याशिवाय ते कृत्य करू शकतात काय? असा प्रश्न पडत आहे.

Arpora Nightclub Fire
Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

‘बर्च’क्लब ‘अग्निशमन’ने पाहिलाच नाही!

विशेष बाब म्हणजे ‘मेझन्स लेक व्ह्यू रिसॉर्ट''ला लागून असलेले पाण्याच्या मधोमध ‘बर्च बाय रोमियो लेन'' हा क्लब अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी कधी पाहिलाच नाही, असेच यावरून दिसून येते.

एनओसीची पुनर्नोंदणी करताना योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांनी तपासणी केलेली नाही. त्या अधिकाऱ्याने दिलेल्या तपासणी अहवालाची खात्याने कधीच तपासणी केली नाही, तरीही त्यांनी एनओसी बहाल केली आहे. ‘बर्च बाय रोमिओ लेन'' ज्या जागेत आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी पुलाची निर्मिती केली आहे. त्याठिकाणी क्लब चालतो, हे पाहण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी कधी पोहोचलेच नाहीत, असेच यावरून दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com