Arpora Sarpanch  Dainik Gomantak
गोवा

Arpora: 'मला पोलिसांनी मंदिरातून उचलले'! हडफडेचे सरपंच कारवाईमुळे संतप्त; भाजपचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करण्याचे केले सूतोवाच

Goa Nightclub Fire: गावस यांच्या आदेशावरून तत्काळ पोलिस स्थानकात हजर राहण्यास सांगितले. पोलिस स्थानकात पोहोचेपर्यंत पोलिसांनी आपला पाठलागही केल्याचा आरोप रेडकर यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: हडफडे येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पोलिस तपासादरम्यान रविवारी दुपारी नागवा-हडफडे येथील सरपंच रोशन रेडकर यांना हणजूण पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून सुमारे चार तास चौकशी केली. पोलिसांनी मला मंदिरातून उचलले, असा आरोपही त्‍यांनी केला.

या घटनेनंतर संतप्त सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितले की आपण या क्षणी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तसेच येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत कळंगुट मतदारसंघात भाजपचा पराभव करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हडफडे येथील एका मंदिरात देवस्थान समितीबरोबर बैठकीत असताना हणजूण पोलिस ठाण्याच्या दोन उपनिरीक्षकांनी मंदिरात येऊन पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या आदेशावरून तत्काळ पोलिस स्थानकात हजर राहण्यास सांगितले. पोलिस स्थानकात पोहोचेपर्यंत पोलिसांनी आपला पाठलागही केल्याचा आरोप रेडकर यांनी केला.

हडफडे क्लब दुर्घटनेच्या तपासात आपण पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत असतानाही चार तास पोलिस स्थानकात बसवून ठेवल्यामुळे आपल्याला मोठा मन:स्ताप झाला. २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीत कळंगुट मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून येणार नाही, असा इशाराही रेडकर यांनी यावेळी दिला.

हणजूण पोलिस स्‍थानकावर स्‍थानिकांचा जमाव

रोशन रेडकर यांना पोलिस स्थानकात चौकशीसाठी बराच वेळ बसवून ठेवल्याने त्‍यांच्‍या समर्थनात मोठ्या संख्येने लोक हणजूण पोलिस स्थानकाबाहेर जमा झाले. जमाव आक्रमक होत स्थानकाच्या आवारात घुसला व तेथील पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारू लागला. मात्र, पोलिसांकडे जमावाच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. जमावाने दावा केला की, रेडकरांना बळीचा बकरा बनवला जात आहे. हा प्रकार म्‍हणजे ‘चोराला सोडून, संन्यासाला फाशी’ असाच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT